आता भारतीय रेल्वेही घेणार रिलायन्स जीओ ईन्फोकॉमची सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 01:03 PM2018-12-05T13:03:26+5:302018-12-05T13:05:44+5:30

अकोला: फोर-जी सेवा देऊन देशभरातील टेलिकॉम कंपन्यांना आव्हान उभ्या करणाऱ्या मेसर्स. रिलायन्स जीओ इन्फोकॉम लिमिटेडने आता भारतीय रेल्वे टेलिकॉमची सेवादेखील ताब्यात घेतली आहे

Reliance Jio Infocom service will also take the Indian Railways | आता भारतीय रेल्वेही घेणार रिलायन्स जीओ ईन्फोकॉमची सेवा

आता भारतीय रेल्वेही घेणार रिलायन्स जीओ ईन्फोकॉमची सेवा

Next
ठळक मुद्दे रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी हा महत्त्वपूर्ण करार रिलायन्ससोबत केला आहे. तसे निर्देश दूरसंचार मंत्रालयाकडून २० नोव्हेंबर २०१८ रोजी भारतीय रेल्वे मंत्रालयास देण्यात आले आहे. रेल्वे मंत्रालयाच्या वित्तीय संचालकांसह विविध विभागांच्या कराराची माहितीदेखील यासोबत पाठविण्यात आली आहे.

- संजय खांडेकर
अकोला: फोर-जी सेवा देऊन देशभरातील टेलिकॉम कंपन्यांना आव्हान उभ्या करणाऱ्या मेसर्स. रिलायन्स जीओ इन्फोकॉम लिमिटेडने आता भारतीय रेल्वे टेलिकॉमची सेवादेखील ताब्यात घेतली आहे. भारतीय संचार निगम लिमिटेड या सर्वात जुन्या कंपनीला डावलून त्या खात्याचे मंत्री पीयूष गोयल यांनी हा महत्त्वपूर्ण करार रिलायन्ससोबत केला आहे. आगामी १ जानेवारी २०१९ पासून देशभरातील रेल्वे टेलिकॉमची सेवा आता रिलायन्स ताब्यात घेणार असून, तसे निर्देश दूरसंचार मंत्रालयाकडून २० नोव्हेंबर २०१८ रोजी भारतीय रेल्वे मंत्रालयास देण्यात आले आहे.
भारत सरकारच्या अखत्यारीत असलेली भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड कंपनी २००७ पासून सातत्याने तोट्यात आहे. त्यामुळे बीएसएनएलमध्ये नोकर भरतीही बंद आहे. खासगी टेलिकॉम-सेल्युलर कंपनीसोबत स्पर्धा करीत तोट्यात जात असलेल्या कंपनीला पुढे आणण्यासाठी मंत्रालयाने कोणतेही नवीन प्रकल्प राबविले नाही; मात्र बीएसएनएल आणि रेल्वे मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री असलेल्या पीयूष गोयल यांनी बीएसएनएलला डावलून रिलायन्सला झुकते माप दिले आहे. रेलटेलचा जुना करार ३१ डिसेंबर २०१८ रोजी मोडीत काढून १ जानेवारी २०१९ पासून ही सेवा रिलायन्स जीओ देणार आहे. दूरसंचार दिल्ली येथील निदेशक हरीश पवारिया यांनी त्यासंबंधीचे निर्देश रेल्वे झोन, मंडळ आणि विभाग अधिकाºयांना यंत्रणा ताब्यात देण्याचे निर्देश दिले आहे. रिलायन्स जीओ इन्फोकॉम लिमिटेडने सीयूजी स्कीम अंतर्गत ए, बी, सी, डी असे चार वर्गीकरण करून ही सेवा रेल्वेला दिली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या वित्तीय संचालकांसह विविध विभागांच्या कराराची माहितीदेखील यासोबत पाठविण्यात आली आहे.

 या रेलटेलचा घेणार ताबा
दिल्ली, नोएडा, हरियाणा, मुंबई, चेन्नई, आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, पंजाब, बिहार, ओडिसा, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, आसाम, नार्थ-ईस्ट, हिमाचल, वेस्ट बंगाल, उत्तर प्रदेश (पूर्व-पश्चिम) रेलटेलची सेवा रिलायन्स लवकरच ताब्यात घेणार आहे.

 

Web Title: Reliance Jio Infocom service will also take the Indian Railways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.