Recruitment process for 68 seats in Akola police from March 12 | अकोला पोलीस दलातील ६८ जागांसाठी १२ मार्चपासून भरती प्रक्रिया
अकोला पोलीस दलातील ६८ जागांसाठी १२ मार्चपासून भरती प्रक्रिया

ठळक मुद्देपोलीस दलातील रिक्त असलेल्या ६८ जागांसाठी पोलीस प्रशासनाद्वारे जाहिरात काढण्यात आली आहे. जिल्ह्यासह बाहेरील तब्बल ११ हजार उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. १२ मार्चपासून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील मैदानावर मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे.


अकोला - अकोला जिल्हा पोलीस दलातील रिक्त असलेल्या ६८ जागांसाठी भरती प्रक्रिया १२ मार्चपासून सुरू होणार असून, यासाठी तब्बल ११ हजारांवर उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत.
अकोला जिल्हा पोलीस दलातील रिक्त असलेल्या ६८ जागांसाठी पोलीस प्रशासनाद्वारे जाहिरात काढण्यात आली आहे. या जाहिरातीनंतर उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. केवळ ६८ जागा रिक्त असताना या जागांवर नोकरी मिळविण्यासाठी जिल्ह्यासह बाहेरील तब्बल ११ हजार उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. यामध्ये विविध संवर्गातील प्रवर्गाचा समावेश आहे. १२ मार्चपासून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील मैदानावर मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर पोलीस मुख्यालयात पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. दररोज १ हजार ५०० उमेदवारांना लेखी मैदानी चाचणीसाठी बोलाविण्यात येणार आहे.

 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.