Ravi Thakur of 'Akola Cricket Club' in the Vidarbha T20 squad | ‘अकोला क्रिकेट क्लब’चा रवी ठाकूर विदर्भ टी-२० संघात
‘अकोला क्रिकेट क्लब’चा रवी ठाकूर विदर्भ टी-२० संघात

ठळक मुद्देअकोला क्रिकेट क्लब (एसीसी)चा डावखुरा मध्यमगती गोलंदाज रवी ठाकूर८ जानेवारीपासून सुरू झालेली ही स्पर्धा १६ जानेवारीपर्यंत खेळली जाणार आहे.टी-२०, एक दिवसीय व चार दिवसीय रणजी स्पर्धेत विदर्भ संघाकडून खेळणारा अकोल्यातील एकमेव खेळाडू ठरला आहे.

अकोला : येथील अकोला क्रिकेट क्लब (एसीसी)चा डावखुरा मध्यमगती गोलंदाज रवी ठाकूर याची निवड रायपूर येथे होत असलेल्या सय्यद मुश्ताकअली टी-२० क्रिकेट स्पर्धेकरिता घोषित झालेल्या विदर्भ संघात झाली आहे. बीसीसीआय अंतर्गत ८ जानेवारीपासून सुरू झालेली ही स्पर्धा १६ जानेवारीपर्यंत खेळली जाणार आहे.
अकोला पोलीस विभागात कार्यरत असलेला रवी ठाकूर हा २०१२ पासून खेळत असून, तो टी-२०, एक दिवसीय व चार दिवसीय रणजी स्पर्धेत विदर्भ संघाकडून खेळणारा अकोल्यातील एकमेव खेळाडू ठरला आहे. रायपूर येथे होणाºया स्पर्धेत विदर्भ संघाचे रेल्वे, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगढ या संघांसोबत साखळी सामने होणार असल्याची माहिती अकोला संघाचे कर्णधार भरत डिक्कर यांनी दिली.
रवी ठाकूर याची टी-२० संघात निवड झाल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त अधीक्षक विजय सागर, अकोला क्रिकेट क्लबचे अध्यक्ष नानूभाई पटेल, उपाध्यक्ष विजय तोष्णीवाल, सचिव विजय देशमुख, कैलाश शहा, दिलीप खत्री, कर्णधार भरत डिक्कर, सदस्य अ‍ॅड. मुन्ना खान, शरद अग्रवाल, गोपाळराव भिरड, माजी कर्णधार विवेक बिजवे, क्रीडा परिषद सदस्य जावेदअली, परिमल कांबळे, सुमेध डोंगरे, आशिष ठाकूर, पवन हलवणे, देवकुमार मुधोडकर, अमित माणिकराव, शारिक खान आदींनी त्याचे अभिनंदन केले आहे.


Web Title: Ravi Thakur of 'Akola Cricket Club' in the Vidarbha T20 squad
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.