रमजान ईदच्या पृष्ठभूमिवर ११२ गुंडांच्या तडीपारीचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 01:29 PM2018-06-08T13:29:27+5:302018-06-08T13:33:05+5:30

अकोला: रमजान ईद उत्सवाच्या पृष्ठभूमिवर शहरात शांतता व कायदा सुव्यवस्था कायम राहावी, या दृष्टिकोनातून शहर पोलीस उप-अधीक्षक उमेश माने पाटील यांनी शहरातील तब्बल ११२ गुंडांच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला.

 Proposal for clearing 112 goons on the backdrop of Ramadan Id | रमजान ईदच्या पृष्ठभूमिवर ११२ गुंडांच्या तडीपारीचा प्रस्ताव

रमजान ईदच्या पृष्ठभूमिवर ११२ गुंडांच्या तडीपारीचा प्रस्ताव

Next
ठळक मुद्देसण, उत्सवाच्या काळात शहरात शांतता नांदावी. कोणताही गंभीर गुन्हा घडू नये, यासाठी पोलीस यंत्रणा दक्ष असते. यासाठी त्यांचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टिकोनातून शहरातील गुंडांना तडीपार करण्यात येते. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या ११२ गुंडांना जिल्ह्यातून तडीपार करण्यासाठी प्रस्ताव तयार केला.

अकोला: रमजान ईद उत्सवाच्या पृष्ठभूमिवर शहरात शांतता व कायदा सुव्यवस्था कायम राहावी, या दृष्टिकोनातून शहर पोलीस उप-अधीक्षक उमेश माने पाटील यांनी शहरातील तब्बल ११२ गुंडांच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला.
सण, उत्सवाच्या काळात शहरात शांतता नांदावी. कोणताही गंभीर गुन्हा घडू नये, यासाठी पोलीस यंत्रणा दक्ष असते. सण, उत्सवामध्ये शहरातील गुंडांकडून कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये. यासाठी त्यांचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टिकोनातून शहरातील गुंडांना तडीपार करण्यात येते. १६ जून रोजी पवित्र रमजान ईद उत्सव असल्याने, या उत्सवात विघ्न नको, म्हणून शहर पोलीस उप-अधीक्षक उमेश माने पाटील यांनी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या आदेशानुसार शहरातील आठही पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या ११२ गुंडांना जिल्ह्यातून तडीपार करण्यासाठी प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव त्यांनी मंजुरीसाठी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. (प्रतिनिधी)

तडीपार करण्यात येणारे गुंड
रामदास पेठ               १९
जुने शहर                   २३
डाबकी रोड                १९
अकोट फैल                १४
एमआयडीसी            १५
खदान                      ०७
कोतवाली                  ०५

 

Web Title:  Proposal for clearing 112 goons on the backdrop of Ramadan Id

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.