वारी हनुमान येथील ‘मामाभाचा’ डोहासंदर्भात आराखडा सादर करा - डॉ. रणजित पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 07:50 PM2018-02-17T19:50:47+5:302018-02-17T20:07:40+5:30

​​​​​​​तेल्हारा (अकोला): वारी हनुमान येथील मामाभाचा डोहासंदर्भात पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून करावयाच्या उपाययोजना संदर्भात समिती नेमून प्रत्यक्ष कामाचा  आराखडा तयार करा, असे निर्देश गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी अकोटचे उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत यांना  दिले.

Present the plan regarding 'MAMABHACHA' pool in Wari Hanuman - Dr. Ranjit Patil | वारी हनुमान येथील ‘मामाभाचा’ डोहासंदर्भात आराखडा सादर करा - डॉ. रणजित पाटील

वारी हनुमान येथील ‘मामाभाचा’ डोहासंदर्भात आराखडा सादर करा - डॉ. रणजित पाटील

googlenewsNext
ठळक मुद्देगत पंचवीस वर्षात या डोहात बुडून मरण पावलेल्या पर्यटकांची संख्या  पोहोचली एकशे एकाहत्तरच्यावर  

लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा (अकोला): वारी हनुमान येथील मामाभाचा डोहासंदर्भात पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या  दृष्टिकोनातून करावयाच्या उपाययोजना संदर्भात समिती नेमून प्रत्यक्ष कामाचा  आराखडा तयार करा, असे निर्देश गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.  रणजित पाटील यांनी अकोटचे उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत यांना  दिले.


गेल्या वर्षभरपासून शासन दरबारी हा विषय सातत्याने लावून धरणारे उत्तम  नळकांडे यांनी शासकीय विश्रामगृहावर डॉ. रणजित पाटील यांची भेट घेतली. या प्रसंगी बैठकीत ते बोलत हेाते. याप्रसंगी युवाशक्तीचे भवानी प्रताप, मयूर चोपडे,  विजय बोर्डे यांनीसुद्धा या विषयावर करावयाच्या उपाययोजनांसदर्भात सूचना  मांडल्या. आराखडा आल्यानंतर विकासकामाकरिता निधी उपलब्ध करून  देण्यात येईल, असे आश्‍वासन ना.पाटील यांनी दिले. मागील वर्षी डॉ. रणजित  पाटील यांनी मामा भाचा डोहास प्रत्यक्ष भेट दिली होती. वान प्रकल्प व महसूल  अधिकारी यांच्या वेळकाढू धोरणामुळे वर्षभरापासून कुठलीही कार्यवाही झाली  नाही. आता तरी प्रश्न मार्गी लागावा, अशी विनंती ना. पाटील यांच्याकडे करण्यात  आली. यावर्षीसुद्धा या डोहात तीन तरुणांचा बुडाल्याने मृत्यू झाला. मागील  पंचवीस वर्षात बुडून मरण पावणार्‍या पर्यटकांची संख्या एकशे एकाहत्तरच्यावर  पोहोचली आहे. याप्रसंगी माजी आमदार डॉ. जगन्नाथ ढोणे, तहसीलदार डॉ.  येवलीकर, एकनाथ ताथोड, सुदेश शेळके, पुंडलीकराव अरबट, सदानंद  खारोडे, धर्मेश चौधरी, नीलेश जवकार, शिवराज अहेरकर, योगेश विचे, भाजप  कार्यकर्ते व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. 

Web Title: Present the plan regarding 'MAMABHACHA' pool in Wari Hanuman - Dr. Ranjit Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.