खासदार धोत्रे बाहेरगावी असल्याने समेटाचे अंदाज कोलमडले!

By Atul.jaiswal | Published: March 3, 2018 03:46 PM2018-03-03T15:46:03+5:302018-03-03T16:56:16+5:30

अकोला : खासदार संजय धोत्रे हे कौटुंबिक सोहळ्यानिमित्त जिल्ह्याबाहेर असल्याने मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे उभय नेत्यांमधील समेट घडवून आणण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांवर पाणी फिरल्याची खमंग चर्चा शनिवारी अकोल्याच्या राजकीय वर्तुळात होती.

possibilty of patch-up beetween sanjay dhotre and ranjeet patil in vain | खासदार धोत्रे बाहेरगावी असल्याने समेटाचे अंदाज कोलमडले!

खासदार धोत्रे बाहेरगावी असल्याने समेटाचे अंदाज कोलमडले!

googlenewsNext
ठळक मुद्दे मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर भाजप नेत्यांची मांदियाळी.खासदार संजय धोत्रे हे कौटुंबिक सोहळ्यानिमित्त जिल्ह्याबाहेर असल्याने मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित राहू शकले नाही.उभय नेत्यांमधील समेट घडवून आणण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांवर पाणी फिरल्याची खमंग चर्चा शनिवारी अकोल्याच्या राजकीय वर्तुळात होती.

 

अकोला : बुलडाणा येथे एका कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद मार्गे ठरलेल्या नियोजित दौºयात बदल करून अकोला मार्गे जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर अकोला विमानतळावर ते गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील आणि खासदार संजय धोत्रे यांच्यात समेट घडवून आणतील अशी अटकळ  बांधली जात होती.  परंतु, खासदार संजय धोत्रे हे कौटुंबिक सोहळ्यानिमित्त जिल्ह्याबाहेर असल्याने मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातील बदलाबाबत व्यक्त करण्यात येत असलेले राजकीय अंदाज सपशेल कोलमडले, दरम्यान, उभय नेत्यांमधील समेट घडवून आणण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांवर पाणी फिरल्याची खमंग चर्चा शनिवारी अकोल्याच्या राजकीय वर्तुळात होती.
अकोल्याचे खासदार संजय धोत्रे व गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्यातील कुरघोडीचे राजकारण जिल्ह्यासाठी नवीन नाही. काल-परवापर्यंत एक सीमारेषेपर्यंत मर्यादीत असलेली या दोन्ही नेत्यांमधील धूसफूस गुरुवारी डॉ. पाटील यांचे गाव असलेल्या घुंगशी येथील ग्रामपंचायत निवडणुकीतील वादाच्या निमित्ताने चव्हाट्यावर आली. डॉ. रणजीत पाटील यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी; अन्यथा १५ दिवसांनंतर आपण आपली भूमिका जाहीर करू, असा निवाणीर्चा इशारा  खासदार संजय धोत्रे यांनी दिला होता. होळीच्या एक दिवस घडलेल्या या राजकीय धुळवडीने या दोन नेत्यांमधील वादाचे विविध रंग समोर आले. या प्रकाराने गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेत असलेल्या भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. दोन बड्या नेत्यांमधील संघर्षामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होऊन त्यामुळे पक्षाचे नुकसान होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उभय नेत्यांमध्ये समेट घडवून आणण्याचे ठरविले होते. शनिवारी बुलडाणा येथे भारतीय जैन संघटनेच्या महाराष्ट्र दुष्काळमुक्त अभियानाच्या उद्घाटनसाठी जाण्याकरीता औरंगाबाद मार्गे न जाता अकोला मार्गे जाऊन विमानतळावर खासदार संजय धोत्रे व डॉ. रणजीत पाटील यांच्याशी चर्चा करून दोघांमध्ये समेट घडवून आणावी, अशी मुख्यमंत्र्यांची योजना असून, त्यासाठीच त्यांनी दौºयात बदल करून घेतला होता, असे भाजपच्या अंतस्थ सूत्रांकडून समजले होते. शनिवारी, मुख्यमंत्र्यांचे विमान अकोला विमानतळावर उतरले त्यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व इतर मान्यवर उपस्थित होते. या नेत्यांच्या स्वागतासाठी अकोल्यातील भाजपचे झाडून सारेच नेते व पदाधिकारी उपस्थित राहिले. डॉ. रणजीत पाटील, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, महापौर विजय अग्रवाल, उप महापौर वैशाली शेळके, माजी महापौर उज्ज्वला देशमुख, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, नगरसेवक गोपी ठाकरे,  जिल्हाधिकारी आस्तीककुमार पांडेय, उपविभागीय अधिकार प्रा. संजय खडसे आदींची उपस्थिती होती. यावेळी भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. खासदार संजय धोत्रे हे मात्र कौटुंबिक कार्यक्रमामुळे जिल्ह्याबाहेर गेलेले असल्याने, ते मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे डॉ. रणजित पाटील व संजय धोत्रे यांच्यात समेट घडवून आणण्याची मुख्यमंत्र्यांची योजना निष्फळ ठरल्याची चर्चा अकोल्यातील राजकीय वर्तुळात दिवसभर होती.

Web Title: possibilty of patch-up beetween sanjay dhotre and ranjeet patil in vain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.