अकोट तालुक्यातील पोपटखेड प्रकल्प : सिंचनाचा प्रश्न अधांतरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 02:21 AM2017-12-22T02:21:42+5:302017-12-22T02:27:35+5:30

अकोट  : अकोट तालुक्यातील पोपटखेड लघु पाटबंधारे योजनेचा टप्पा -२ या प्रकल्पाचे काम  पुर्णत्वास येत आहे. या प्रकल्पातून सिंचनाकरिता शेतकर्‍यांना उपलब्ध करून द्यावयाचे पाणी कालव्याद्वारे द्यावे की पाइपलाइन टाकून द्यावे, हा  निर्णय शेतकर्‍यांच्या हिताचा ठरणार की अधिकारी, कंत्राटदार यांच्या पथ्थ्यावर पडणार? या प्रश्नाचे गौडबंगाल कायम असताना आमदार प्रकाश भारसाकळे यांची अभ्यासू भूमिका यासंदर्भात महत्त्वाची ठरणार आहे. 

Poppetheed project in Akot taluka: the question of irrigation is final! | अकोट तालुक्यातील पोपटखेड प्रकल्प : सिंचनाचा प्रश्न अधांतरी!

अकोट तालुक्यातील पोपटखेड प्रकल्प : सिंचनाचा प्रश्न अधांतरी!

googlenewsNext
ठळक मुद्देकालवा की पाइपलाइने पाणीपुरवठा यावरून संभ्रम

विजय शिंदे। 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट  : अकोट तालुक्यातील पोपटखेड लघु पाटबंधारे योजनेचा टप्पा -२ या प्रकल्पाचे काम  पुर्णत्वास येत आहे. या प्रकल्पातून सिंचनाकरिता शेतकर्‍यांना उपलब्ध करून द्यावयाचे पाणी कालव्याद्वारे द्यावे की पाइपलाइन टाकून द्यावे, हा  निर्णय शेतकर्‍यांच्या हिताचा ठरणार की अधिकारी, कंत्राटदार यांच्या पथ्थ्यावर पडणार? या प्रश्नाचे गौडबंगाल कायम असताना आमदार प्रकाश भारसाकळे यांची अभ्यासू भूमिका यासंदर्भात महत्त्वाची ठरणार आहे. 
सातपुड्याच्या  पायथ्याशी पोपटखेड येथे सिंचन क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने टप्पा दोनचे काम सुरू आहे. याकरिता नुकताच शासनाने मोठय़ा प्रमाणात निधीसुद्धा उपलब्ध करून दिला आहे. घडभरणी व शीर्षविमोचकाचे काम पूर्ण झाल्यानंतर सिंचनाकरिता जुन्या अंदाजपत्रकात कालव्याद्वारे पाणी वितरण व्यवस्था प्रस्तावित आहे; परंतु  शेतकर्‍यांना सुरळीत व मुबलक पाणी पुरवठा होण्याच्या दृष्टीने कालव्याऐवजी पाइपलाइनद्वारे पाणी वितरण करण्याची मागणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे ऑक्टोबर महिन्यात आमदार प्रकाश भारसाकळे यांनी केली होती, तसेच शासनाने सिंचनाकरिता पाइपलाइनद्वारेच पाणी पुरवठा करण्याचे धोरण ठरविले आहे.  त्यावर जलसंपदा मंत्री यांनी प्रकाश भारसाकळे यांच्या मागणीला महत्त्व देत पाइपलाइनने पुरवठा करण्याच्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाला दिल्याची माहिती आहे. त्यामुळे महामंडळाने कालव्यासाठी भू संपादन करण्याची प्रक्रिया थांबविण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कालव्यांच्या कामात हितसंबंध गुंतलेल्या काही अधिकार्‍यांनी पाइपलाइनद्वारे पाणी वितरण होऊ नये, याकरिता आटापिटा सुरू केला असल्याची माहिती आहे. त्याकरिता आमदार प्रकाश भारसाकळे यांचेसुद्धा मन वळविण्यात कंत्राटदार व काही अधिकारी धडपडत आहेत. दुसरीकडे लाभक्षेत्रात येणार्‍या शेतकर्‍यांनी मात्र १७ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री व पालकमंत्री, खासदार यांच्याकडे पाइपलाइनद्वारेच पाणी वितरण करण्याची मागणी रेटून धरली             आहे. यामध्ये सुधारित अंदाजपत्रक सादर करून पाइपलाइननेच पाणी द्यावे, यासाठी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळास व संबंधित यंत्रणेला निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे. 

तर एक आदर्श प्रकल्प होऊ शकतो 
1पोपटखेड धरणावरून पाइपलाइनने पाणी सिंचनाकरिता वितरित केल्यास जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते, तसेच पाण्याची नासाडी न होता विनातक्रार वितरण व्यवस्था सुलभ होऊ शकते.  शेतीचेसुद्धा तुकडे पडणार नाहीत. रस्त्याचीसुद्धा अडवणूक होणार नाही. विशेषत: भूसंपादनावर होणारा कोट्यवधींचा खर्च व त्यानंतर कालवे करण्याकरिता कंत्राटदाराला निविदेनुसार द्याव्या लागणार्‍या कोट्यवधी रुपयांच्या बचतीमधून जुन्या पोपटखेड प्रकल्पाच्या कालव्यावरसुद्धा पाइपलाइन टाकल्यास शेतकर्‍यांचे सिंचनाचे हित साध्य होईल. 
2याकरिता अंदाजपत्रकात कालव्याऐवजी पाइपलाइनकरिता प्रयत्न केल्यास पोपटखेड प्रकल्प एक आदर्श प्रकल्प ठरू शकतो. त्याकरिता आमदार प्रकाश भारसाकळे यांची कोणती भूमिका राहते, याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Poppetheed project in Akot taluka: the question of irrigation is final!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.