पंतप्रधानांनी साधला 'सौभाग्य'च्या लाभार्थ्यांशी संवाद; अकोला जिल्ह्यातील लाभार्थींचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 04:37 PM2018-07-20T16:37:22+5:302018-07-20T16:41:26+5:30

अकोला : सौभाग्य योजनेच्या देशभरातील लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रातील लाभार्थीही जिल्हानिहाय उपस्थित होते.

 PM talks to beneficiaries of Akola District | पंतप्रधानांनी साधला 'सौभाग्य'च्या लाभार्थ्यांशी संवाद; अकोला जिल्ह्यातील लाभार्थींचा सहभाग

पंतप्रधानांनी साधला 'सौभाग्य'च्या लाभार्थ्यांशी संवाद; अकोला जिल्ह्यातील लाभार्थींचा सहभाग

Next
ठळक मुद्देसौभाग्य योजनेच्या देशभरातील लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांचेसह अभियंते व जिल्ह्यातील निवडक लाभार्थ्यांची उपस्थिती होती.

अकोला : सौभाग्य योजनेच्या देशभरातील लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रातील लाभार्थीही जिल्हानिहाय उपस्थित होते. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील राष्ट्रीय माहिती केंद्रात महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे, अधीक्षक अभियंते पवनकुमार कछोट आणि राहुल बोरीकर, कार्यकारी अभियंता गजेंद्र गडेकर यांचेसह अभियंते व जिल्ह्यातील निवडक लाभार्थ्यांची उपस्थिती होती.
पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेल्या सौभाग्य योजनेंतर्गत महाराष्ट्राने प्रभावी कामगिरी केली असून, आतापर्यन्त ४७ हजार लाभार्थ्यांना यायोजनेत नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. या योजनेचा पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये आढावा घेतला. यावेळी पंतप्रधानांनी ७० वर्षांनंतर महावितरणने समुद्राच्या तळाशी मरीन केबल टाकून घारापुरी बेटाच्या विद्युतीकरणाच्या कामाचे पुन्हा एकदा कौतूक केले.

४७ हजार लाभार्थ्यांंना वीजजोडण्या
सौभाग्य योजनेत शहरी व ग्रामीण भागात विद्युतीकरण न झालेल्या घरांना वीजजोडणी देण्यात येत असून यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांनानि:शुल्क तर इतर लाभार्थ्यांना नाममात्र ५०० रुपये शुल्क भरून वीजजोडणी देण्यात येत आहे. महाराष्ट्रात आतापर्यन्त ४७ हजार लाभार्थ्यांना या योजनेत वीजजोडण्या देण्यात आलेल्या आहेत. उर्वरित सर्व लाभार्थ्यांना ३१ डिसेंबर २०१८ पर्यन्त वीजजोडणी देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात ग्रामीण व शहरी भागातीलवीजजोडणीपासून वंचित असणाऱ्या कुटुंबांना वीजजोडणी देण्यासाठी १,९४५ कोटी रुपये खर्च येणार आहे.

Web Title:  PM talks to beneficiaries of Akola District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.