तेल्हारा तालुक्यातील पिंपरखेडचा पाणी पुरवठा दोन महिन्यांपासून बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 02:35 AM2018-03-29T02:35:57+5:302018-03-29T02:35:57+5:30

तेल्हारा : तालुक्यातील पिंपरखेड येथील ग्रामपंचायतने विद्युत बिल न भरल्यामुळे गावातील पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा दोन महिन्यांपासून बंद झाल्याने गावकरी पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत आहेत.

Pinchchhed water supply in Telhara taluka closed for two months! | तेल्हारा तालुक्यातील पिंपरखेडचा पाणी पुरवठा दोन महिन्यांपासून बंद!

तेल्हारा तालुक्यातील पिंपरखेडचा पाणी पुरवठा दोन महिन्यांपासून बंद!

googlenewsNext
ठळक मुद्देविद्युत बिल न भरल्यामुळे पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : तालुक्यातील पिंपरखेड येथील ग्रामपंचायतने विद्युत बिल न भरल्यामुळे गावातील पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा दोन महिन्यांपासून बंद झाल्याने गावकरी पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत आहेत.
येथील ग्रामपंचायतची निवडणूक अवघ्या चार महिन्यांपूर्वी झाली; परंतु येथील ग्रामपंचायतने पाणी पुरवठा योजनेच्या वीज पुरवठ्याचे बिल न भरल्यामुळे महावितरण कंपनीने विद्युत पुरवठा बंद केला. परिणामी, गावकऱ्यांना हापशीवरून दूषित पाणी आणून प्यावे लागत आहे. सदर पाण्यामुळे गावात किडनीच्या आजारात वाढ झाली आहे. आदिवासी बांधव मोलमजुरी पाडून शेतातून पाणी आणत आहेत. शासन एकीकडे आदिवासी गावासाठी विविध योजना राबवून कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. पिंपरखेड येथील आदिवासी बांधवांना मात्र पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

मी ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचा पदभार सध्याच घेतला आहे. आता गावातून पाणीपट्टी वसूल करून वीज बिल भरणार, त्यानंतर लवकरच गावातील पाणी पुरवठा सुरू करू.
- शिवाजी पतिंगे,
सरपंच, पिंपरखेड वारी.

Web Title: Pinchchhed water supply in Telhara taluka closed for two months!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.