पेट्रोल दरवाढ; शिवसेनेचा सायकल रिक्षा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 01:29 AM2017-09-21T01:29:44+5:302017-09-21T01:30:15+5:30

अकोला : केंद्रात सत्तास्थानी असलेल्या भाजपाने अवघ्या तीन वर्षांच्या कालावधीत पेट्रोल-डीझलच्या किमतीत वाढ करून जनतेसाठी ‘अच्छे दिन’ आणले आहेत. भाजपा सरकारने लादलेल्या अधिभारामुळे इंधनाच्या किमती आकाशाला भिडल्याचा आरोप करीत शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सायकल रिक्षा मोर्चा काढून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला. 

Petrol price hike; Shiv Sena's Rickshaw Morcha | पेट्रोल दरवाढ; शिवसेनेचा सायकल रिक्षा मोर्चा

पेट्रोल दरवाढ; शिवसेनेचा सायकल रिक्षा मोर्चा

googlenewsNext
ठळक मुद्दे‘डीबी स्कॉड’ पथक कुचकामीशहर प्रमुख झाले ‘सारथी’

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : केंद्रात सत्तास्थानी असलेल्या भाजपाने अवघ्या तीन वर्षांच्या कालावधीत पेट्रोल-डीझलच्या किमतीत वाढ करून जनतेसाठी ‘अच्छे दिन’ आणले आहेत. भाजपा सरकारने लादलेल्या अधिभारामुळे इंधनाच्या किमती आकाशाला भिडल्याचा आरोप करीत शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सायकल रिक्षा मोर्चा काढून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला. 
पेट्रोल-डीझलच्या किमतीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. २0१४ मधील लोकसभा निवडणुकीत इंधनाच्या किमती कमी करण्याचे आश्‍वासन भाजपाने दिले होते. केंद्रात सत्तेत आल्यानंतर भाजपाला आश्‍वासनांचा विसर पडल्याचे दिसत असून, इंधनाच्या किमती आवाक्याच्या बाहेर गेल्या आहेत. सोने-चांदीच्या व्यवहारावर तीन टक्के कर आकारणी केल्यानंतर जीएसटी लागू केला. जीएसटीमुळे देशाचा ‘जीडीपी’ घसरला असून, त्यापाठोपाठ आता पेट्रोल-डीझलच्या दरात मोठी वाढ केली आहे. काळ्या पैशांचा पाऊस पाडण्याची घोषणा करणार्‍या भाजपाचा खरा चेहरा समोर आल्याचा आरोप करीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर सायकल रिक्षा मोर्चा काढला. शासनाने इंधनाची दरवाढ त्वरित मागे न घेतल्यास सेनेच्यावतीने उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे देण्यात आला. 
यावेळी मोर्चात मनपा गटनेता राजेश मिश्रा, शहर प्रमुख अतुल पवनीकर, नगरसेवक मंगेश काळे, गजानन चव्हाण, शशिकांत चोपडे, प्रदीप गुरुखुद्दे, सागर भारुका, शरद तुरकर, जि.प. सर्कल प्रमुख दिनेश सरोदे, सुरेंद्र विसपुते, उपशहर प्रमुख अभिषेक खरसाडे, के दार खरे, बंडू सवाई, योगेश गीते, अश्‍विन नवले, अविनाश मोरे, राहुल कराळे, योगेश बुंदेले, ज्योत्स्ना चोरे, मा. नगरसेविका देवश्री ठाकरे, शुभांगी किनगे, सुनीता श्रीवास, सुनील डुक रे, रवी सातपुते, रूपेश ढोरे, गजानन बोराळे, सुनील दुर्गिया, लक्ष्मण पंजाबी, प्रकाश वानखडे, विलास ताले, राजेश इंगळे, सतीश मानकर, स्वप्निल अहिर, रोशन राज, उमेश श्रीवास्तव आदींसह असंख्य शिवसैनिक सहभागी झाले होते. 

‘डीबी स्कॉड’ पथक कुचकामी
शिवसेनेत मोर्चासाठी सक ाळपासूनच लगबग सुरू झाली होती. सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे शिवसैनिक जमा झाले. त्यानंतर शिवसैनिकांनी स्थानिक विश्रामगृहाकडे मोर्चा वळवला. 
मोर्चाचे नेमके ‘लोकशन’ शोधण्यात सिव्हिल लाइनचे ‘डीबी स्कॉड’ अपयशी ठरल्यामुळे की काय, ऐन वेळेवर ठाणेदारांसह कर्मचार्‍यांची धावपळ उडाल्याचे चित्र दिसून आले. 

शहर प्रमुख झाले ‘सारथी’
शिवसेनेच्या सायकल रिक्षा मोर्चात शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी स्वत: रिक्षा चालवला. या रिक्षात जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्यासह प्रमुख पदाधिकार्‍यांचा समावेश होता. हातात निषेधाचे फलक घेऊन शिवसैनिकांनी दिलेल्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता.

Web Title: Petrol price hike; Shiv Sena's Rickshaw Morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.