अकोटात तूर खरेदी रखडली!

By Ram.deshpande | Published: July 26, 2017 02:25 AM2017-07-26T02:25:02+5:302017-07-26T02:25:23+5:30

pending tur purchesing | अकोटात तूर खरेदी रखडली!

अकोटात तूर खरेदी रखडली!

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांच्या आदेशानंतरही शेतकºयांची प्रतीक्षा कायम!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट: गेल्या अनेक महिन्यांपासून तूर खरेदीकरिता शेतकºयांना ताटकळत ठेवण्यात आले. दरम्यान, २५ जुलै रोजी अकोट बाजार समितीत सुरू होणाºया नाफेडच्या तूर खरेदीचा मुहूर्त निघू शकला नाही. गोदाम व ग्रेडरअभावी तूर खरेदी रखडली. त्यामुळे शेतकºयांनी संताप व्यक्त केला.
नाफेडने यावर्षी तूर खरेदी सुरू केल्यानंतर विविध कारणे देऊन शेतकºयांना ताटकळत ठेवले. दरम्यान, आतापर्यंत अकोट बाजार समितीत ८२ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. दरम्यान, तूर खरेदीत व्यापाºयांचा शिरकाव होत असल्याच्या तक्रारी झाल्याने तूर खरेदी बंद करून नव्याने शेतकºयांना टोकण वाटप करण्यात आले. अकोट बाजार समितीत ४ हजार ९४९ शेतकºयांना टोकण वाटप करण्यात आले तर ४ हजार ५१४ टोकणधारक शेतकºयांच्या तुरीचे मोजमाप बाकी आहे. एकरी एक पोते या हिशोबाने एका शेतकºयाची जास्तीत जास्त २५ क्विंटल तूर खरेदी करण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे २५ जुलै रोजी बाजार समितीत शेतकºयांनी आपली तूर खरेदीकरिता आणली होती; परंतु या ठिकाणी अकोट बाजार समितीने तूर खरेदीची मोजमापासह व्यवस्था करून ठेवली होती. दरम्यान, नाफेडला गोदाम व ग्रेडर नसल्याने ही खरेदी सुरू होऊ शकली नाही. खरेदी-विक्री संघाकडेसुद्धा गोदाम उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे शेतकºयांनी संताप व्यक्त केला.

सीसी कॅमेºयात खरेदी
अकोट बाजार समितीत ज्या ठिकाणी तूर खरेदीचे मोजमाप होणार आहे, त्या ठिकाणी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या आदेशानुसार बाजार समितीने दोन सीसी कॅमेरे लावले आहेत. तूर खरेदीमध्ये पारदर्शकता राहावी, शेतकºयांचीच तूर खरेदी व्हावी या दृष्टीने हे सीसी कॅमेरे सज्ज करण्यात आले आहेत.

Web Title: pending tur purchesing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.