पावसाळयात अकोला जिल्ह्यातील  १५९ गावांमध्ये साथरोगाचा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 02:41 PM2018-06-24T14:41:11+5:302018-06-24T14:45:03+5:30

अकोला : पावसाळयाच्या सुरुवातीला जलजन्य साथरोगांचा धोका असलेल्या १५९ गावांमध्ये खबरदारीच्या उपाययोजनांसह आरोग्य कर्मचाऱ्यांनी सतर्क राहण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले आहेत

pandemic diseases 159 villages in Akola district! | पावसाळयात अकोला जिल्ह्यातील  १५९ गावांमध्ये साथरोगाचा धोका!

पावसाळयात अकोला जिल्ह्यातील  १५९ गावांमध्ये साथरोगाचा धोका!

Next
ठळक मुद्देदरवर्षी पावसाळयाच्या सुरुवातीला अनेक गावांमध्ये पाण्यातून पसरणाऱ्या रोगांची लागण होते. नदीकाठच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यातून जलजन्य आजाराचा धोका वाढतो. साथरोग उद्भवल्यास रुग्णांवर तातडीने प्रथमोपचार करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची तयारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केली आहे.

अकोला : पावसाळयाच्या सुरुवातीला जलजन्य साथरोगांचा धोका असलेल्या १५९ गावांमध्ये खबरदारीच्या उपाययोजनांसह आरोग्य कर्मचाऱ्यांनी सतर्क राहण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले आहेत. ग्रामस्थांनी आजाराची लक्षणे दिसताच आरोग्य केंद्रात धाव घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
दरवर्षी पावसाळयाच्या सुरुवातीला अनेक गावांमध्ये पाण्यातून पसरणाऱ्या रोगांची लागण होते. मोठ्या प्रमाणात रुग्णांना त्याचा फटका बसल्याने साथरोगात रूपांतर होते. नदीकाठच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यातून जलजन्य आजाराचा धोका वाढतो. जिल्ह्यात असा धोका असलेली १५९ गावे असल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. त्या गावांमध्ये पावसाळयात साथरोग उद्भवल्यास रुग्णांवर तातडीने प्रथमोपचार करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची तयारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केली आहे. तसे आदेश जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. एम.एम.राठोड यांनी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.
 

साथरोगाचा धोका असलेली गावे


अकोला तालुका : म्हैसांग, कट्यार, कपिलेश्वर, वडद, एकलारा, दोनवाडा, कासली बुद्रूक, नावखेड, अंबिकापूर, घुसर, कानशिवणी, येळवण, दुधलम, शिलोडा, खांबोरा, उगवा, पाळोदी, दुधाळा, अमानतपूर, लोणाग्रा, हातला, गांधीग्राम, धामणा, सुकोडा, भोड, पाटी.
बार्शीटाकळी : काजळेश्वर, दगडपारवा, दोनद बुद्रूक, रुस्तमाबाद, पिंपळखुटा, विझोरा, कातखेड, फेटरा, महान, दोनद खुर्द, मोºहळ, वडगाव, जनुना, चिंचखेड.


अकोट : कुटासा, आलेवाडी, रेल, गिरजापूर, करतवाडी, विटाळी, वरूर, जऊळका, पिंपळखुटा, पोपटखेड, मुंडगाव, महागाव खुर्द, वस्तापूर, सावरगाव.
तेल्हारा : बोरव्हा, पाथर्डी, सिरसोली, अडगाव, भिली, धोंडाआखर, चिपी, करी, चितलवाडी, तळेगाव बाजार, हिवरखेड, हिंगणी बुद्रूक, बेलखेड, पिंपरखेड, चिचारी, चंदनपूर, झरी बाजार, वारी, बारूखेड, नागरदास, उमरशेवडी, दिवाणझरी, नेर, मनब्दा, पंचगव्हाण, दहीगाव अवताडे, मनात्री बुद्रूक, तळेगाव डवला.


मूर्तिजापूर : उमरी, हिरपूर, राजूरा सरोदे, कार्ली, मंगरुळ कांबे, गाझीपूर टाकळी, एंडली, कुरूम, अनभोरा, राजूरा घाटे, सालतवाडा, समशेरपूर.
बाळापूर : सातरगाव, हिंगणा, मनारखेड, शेळद, हाता, हातरुण, बोरगाव वैराळे, अंदुरा, सोनाळा, तामशी, पिंपळगाव, धाडी, बल्लाडी, चिंचोली, बटवाडी, सांगवी, खामखेड, मांडवा, कुपटा.


पातूर : शिर्ला, खामखेड, आस्टुल, पास्टुल, कोठारी बुद्रूक, आगीखेड, पाडी, बोडखा, भंडारज बुद्रूक, भंडारज खुर्द, बेलुरा बुद्रूक, बेलुरा खुर्द, तांदळी, दिग्रस खुर्द, विवरा, अंधारसावंगी, चोंढी, आलेगाव, गोळेगाव, चरणगाव, वरणगाव, सोनुना, मळसूर, वसाली, राहेर, अडगाव, झरंडी, गावंडगाव, सावरगाव, वनदेव, सस्ती, दिग्रस, तुलंगा, लावखेड, सांगोळा, पिंपळखुटा, वहाळा, चान्नी, खेट्री, शिरपूर, चांगेफळ, तुलंगा बुद्रूक.

 

Web Title: pandemic diseases 159 villages in Akola district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.