शेतकर्‍यांसाठी खुले करणार नवतंत्रज्ञान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 02:10 AM2017-10-18T02:10:54+5:302017-10-18T02:12:16+5:30

अकोला: नऊ हुतात्मा, अनेक जण जायबंदी झाल्यानंतर २0 ऑक्टोबर १९६९ साली अकोल्याला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मिळाले. हा दिवस कृषी विद्यापीठाचा स्थापना दिवस म्हणून दरवर्षी येथे साजरा केला जातो. याच दिवसाच्या अनुषंगाने कृषी विद्यापीठाने विकसित केलेले संशोधन, तंत्रज्ञान शेतकर्‍यांना बघण्यासाठी खुले केले जाते.

Opportunity to open for farmers! | शेतकर्‍यांसाठी खुले करणार नवतंत्रज्ञान!

शेतकर्‍यांसाठी खुले करणार नवतंत्रज्ञान!

Next
ठळक मुद्देडॉ. पंदेकृविचा स्थापना दिवसविदर्भस्तरीय शेतकरी शिवारफेरी २७ ऑक्टोबरपासून

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: नऊ हुतात्मा, अनेक जण जायबंदी झाल्यानंतर २0 ऑक्टोबर १९६९ साली अकोल्याला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मिळाले. हा दिवस कृषी विद्यापीठाचा स्थापना दिवस म्हणून दरवर्षी येथे साजरा केला जातो. याच दिवसाच्या अनुषंगाने कृषी विद्यापीठाने विकसित केलेले संशोधन, तंत्रज्ञान शेतकर्‍यांना बघण्यासाठी खुले केले जाते. यावर्षी २५ ते २७ ऑक्टोबरपर्यंंत कृषी विद्यापीठाच्या अकोला मुख्यालयी याच विदर्भस्तरीय शेतकरी शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
अकोल्याला कृषी विद्यापीठाची स्थापना होण्यासाठी या भागात मोठे आंदोलन उभारण्यात आले होते. या आंदोलनकर्त्यांंवर गोळीबार करण्यात आला होता. त्यात नऊ जण शहीद झाले, अनेक जण कायमचे जायबंदी झाल्यांतनर येथे कृषी विद्यापीठ देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर २0 ऑक्टोबर १९६९ साली येथे विद्यापीठ स्थापन झाले. या ४८ वर्षांंच्या काळात कृषी विद्यापीठाने अनेक नवी संशोधन, तंत्रज्ञान विकसित केली असून, त्याचा शेतकर्‍यांना लाभ होत आहे. संशोधनाची प्रक्रिया निरंतर सुरू  आहे. हेच नवे आधुनिक तंत्रज्ञान, कृषी अवजारे, कृषी विद्यापीठाचे विविध मॉडेल शेतकर्‍यांना बघण्यासाठी खुले करण्यात येते. यावर्षीही कृषी विद्यापीठाने शिवारफेरीची जय्यत तयारी केली आहे.
या शिवारफेरीत कापूस, लिंबूवर्गीय फळे, ज्वारी, कडधान्य, तेलबिया, कोरडवाहू शेती, औषधी व सुगंधी वनस्पती, पशुसंवर्धन तथा दुग्धव्यवसाय आदी विभागांसह डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती केंद्र, शेती मशागतीची यंत्रे व अवजारे, कापणी पश्‍चात तंत्रज्ञान, फळे व भाजीपाला लागवड तंत्रज्ञानासह काळाची गरज बनलेल्या सेंद्रिय शेती विभागांना या शिवारफेरीदरम्यान भेटी देता येणार असून, शेतीविषयक तांत्रिक चर्चासत्राचेसुद्धा आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एम. भाले यांच्या प्रमुख उपस्थितीत २५ ऑक्टोबर रोजी सकाळी १0 वाजता शिवार फेरीचे उद्घाटन करतील.

शिवारफेरीचा जिल्हानिहाय कार्यक्रम 
 २५ ऑक्टोबर रोजी बुलडाणा, वर्धा, गोंदिया व भंडारा जिल्हा, २६ ऑक्टोबर रोजी वाशिम, अमरावती, नागपूर व यवतमाळ जिल्हा तर २७ रोजी अकोला, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी या शिवारफेरीत सहभागी  होऊ शकतात. या शिवारफेरीमध्ये सहभागी होणार्‍या शेतकर्‍यांची नोंदणी दररोज सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंंंत शेतकरी सदन (विद्यापीठ क्रीडांगणासमोर) अकोला येथे नाममात्र शुल्क रु. १0 भरून करता येईल.

कृषी विद्यापीठ स्थापना दिनानिमित्त यावर्षीही विदर्भस्तरीय शेतकरी शिवारफेरीचे आयोजन करयात आले असून, शेतकर्‍यांना लाभ घेण्यासाठी संशोधन खुले केले जाईल. तसेच कृषी शास्त्रज्ञ मार्गदर्शन करतील. यावर्षी दिवाळी सण असल्याने शिवारफेरी २0 ऑक्टोबरऐवजी २५ ऑक्टेाबर रोजी सुरू  होणार आहे.
- डॉ.डी.एम. मानकर,
संचालक संशोधन,डॉ. पंदेकृवि, अकोला.

Web Title: Opportunity to open for farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.