केवळ ६५ शेतकर्‍यांचे कर्ज खाते ‘नील’!

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, November 11, 2017 1:17am

कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्हय़ा तील शेतकर्‍यांपैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकबाकीदार  केवळ ६५ शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यात २२ लाख ७१ हजार ६२६ रुपये  कर्जमाफीची रक्कम शुक्रवारी जमा करण्यात आली असून, संबंधित शे तकर्‍यांचे कर्ज खाते अखेर ‘नील’ करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्हय़ा तील शेतकर्‍यांपैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकबाकीदार  केवळ ६५ शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यात २२ लाख ७१ हजार ६२६ रुपये  कर्जमाफीची रक्कम शुक्रवारी जमा करण्यात आली असून, संबंधित शे तकर्‍यांचे कर्ज खाते अखेर ‘नील’ करण्यात आले. शासनाच्या कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हय़ात १ लाख ९१ हजार १८७ शे तकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती  सहकारी बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या थकबाकीदार शेतकर्‍यांचा  समावेश आहे. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्हय़ातील एकूण शे तकर्‍यांपैकी १ लाख १२ हजार ४0६ शेतकर्‍यांची माहिती जिल्हा मध्यव र्ती सहकारी बँकेमार्फत शासनाच्या ‘पोर्टल’वर ‘अपलोड’ करण्यात  आली. त्यापैकी ७८ शेतकर्‍यांच्या ‘ग्रीन’ याद्या शासनामार्फत बँकेला प्राप्त  झाल्या. संबंधित शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी २२ लाख ७१  हजार ६२६ रुपयांची रक्कम शासनामार्फत प्राप्त झाली.  उपलब्ध रक्कम ७८ पैकी  ६५ शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात जमा करून,  संबंधित ६५ शेतकर्‍यांचे कर्ज खाते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमार्फत  ‘नील’ करण्यात आले. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्हय़ातील एकूण  शेतकर्‍यांपैकी आतापर्यंत केवळ ६५ शेतकर्‍यांचे कर्जखाते ‘नील’  करण्यात आले असले तरी, जिल्हय़ातील उर्वरित १ लाख ९१ हजार १२२  शेतकर्‍यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह  निर्माण झाले आहे.   

जिल्हय़ातील कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांपैकी ७८ शे तकर्‍यांच्या ‘ग्रीन’ याद्या प्राप्त झाल्या. त्यापैकी ६५ शेतकर्‍यांच्या कर्ज  खात्यात कर्जाची रक्कम जमा करण्यात आली असून, जिल्हा मध्यवर्ती  सहकारी बँकमार्फत संबंधित शेतकर्‍यांचे कर्जखाते ‘नील’ करण्यात  आले. - जी.जी. मावळे,  जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)

संबंधित

कुठे वारकऱ्यांना मोफत दूध; तर कुठे विद्यार्थ्यांमध्ये दुधाचं वाटप; आंदोलकांकडून दूध सत्कारणी
धक्कादायक ! मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने वृद्धावर हल्ला करत दीडतास तोडले लचके
बारामती तालुक्यात दूध दरवाढ आंदोलनाला प्रतिसाद
परभणी येथे ग्रामस्थांचे रस्त्यासाठी गुराढोरांसह उपोषण
शेतकऱ्यांना उत्पादनवाढीचा सल्ला

अकोला कडून आणखी

आषाढीनिमित्त एसटी महामंडळ सोडणार अकोला-वाशिम जिल्ह्यातून १३५ गाड्या!
२८ एकरांवरील खोदतळ्यांमध्ये पाणी साठा!
बोंडअळीचे ‘पतंग’ पुन्हा धडकले
अकोला जिल्हा परिषद अध्यक्षाच्या लाचखोर पीएविरुद्ध गुन्हा दाखल
पावसाळ्यात विद्युत सुरक्षेचे नियम पाळा, अपघात टाळा! - महावितरणचे आवाहन

आणखी वाचा