राष्ट्रीय महामार्गावर ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 01:19 PM2018-12-12T13:19:27+5:302018-12-12T13:20:41+5:30

बोरगाव मंजू: ट्रक - मोटरसायकल  अपघातात एक ठार तर एक गंभीर झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर  अनभोरा  नजीक  कुष्ठरोग धाम  वळणावर   बुधवारी 12 डिसेंबर रोजी सकाळ दरम्यान घडली.

One killed by a truck on the national highway | राष्ट्रीय महामार्गावर ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार ठार 

राष्ट्रीय महामार्गावर ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार ठार 

Next
ठळक मुद्दे या अपघातात  दुचाकीस्वार  विशाल वासुदेव चक्रनारायण वय 25 वर्ष ह्याचा जागीच  मृत्यू झाला. भारत गडेकर हा जखमी झाला. बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात ट्रकचालक संतोष कश्यप यास ताब्यात घेण्यात आले.  

बोरगाव मंजू: ट्रक - मोटरसायकल  अपघातात एक ठार तर एक गंभीर झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर  अनभोरा  नजीक  कुष्ठरोग धाम  वळणावर   बुधवारी 12 डिसेंबर रोजी सकाळ दरम्यान घडली.

मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्याहद्दीतील  अनभोरा कुष्ठरोग धाम नजीक एका वळणावर   जात असता  विशाल चक्रनारायण व    भारत गाडेकर   आपल्या दाळंबी गावातून मुर्तीजापुर कडे   मोटारसायकल (एम. एच. 27 बिडी 4103) वरुन जात  असता मूर्तिजापूर कडून अकोला कडे जाणारा मालवाहक  ट्रक ( जी. जे.02 एस.एस.5157) ने  धडक दिली. या अपघातात  दुचाकीस्वार  विशाल वासुदेव चक्रनारायण वय 25 वर्ष ह्याचा जागीच  मृत्यू झाला, तर भारत गडेकर हा जखमी झाला .   दरम्यान अपघात करून ट्रक ने पळ काढला असता  नागरिकांनी  ट्रक पकडून पोलिसाच्या ताब्यात दिला. दरम्यान घटनेची माहीती मिळताच घटनास्थळावर बोरगाव मंजु पोलीस ठानेदार विजय मगर, मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस यांनी धाव घेऊन घटनेचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता मुर्तीजापुर ग्रामीण रुग्णालयात दाखल करून   बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात ट्रकचालक संतोष कश्यप यास ताब्यात घेण्यात आले.  

Web Title: One killed by a truck on the national highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.