अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 06:32 PM2018-06-10T18:32:39+5:302018-06-10T18:32:39+5:30

तेल्हारा/ वाडी अदमपूर : भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना वांगरगाव ते उकळी बाजार रोडवर ९ जून रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.

One killed, one seriously injured in an accident | अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार, एक गंभीर

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार, एक गंभीर

googlenewsNext
ठळक मुद्देलक्ष्मण खुशाल घाटोळ (४५) असे मृतकाचे नाव असून, गजानन ओंकार पोहणकार हे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.इसापूर येथील रहिवासी लक्ष्मण खुशाल घाटोड व गजानन ओंकार पोहणकर हे दोघे वीट घेण्यासाठी कारंजा येथे गेले होते.

तेल्हारा/ वाडी अदमपूर : भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना वांगरगाव ते उकळी बाजार रोडवर ९ जून रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. लक्ष्मण खुशाल घाटोळ (४५) असे मृतकाचे नाव असून, गजानन ओंकार पोहणकार हे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
तेल्हारा तालुक्यातील इसापूर येथील रहिवासी लक्ष्मण खुशाल घाटोड व गजानन ओंकार पोहणकर हे दोघे वीट घेण्यासाठी कारंजा येथे गेले होते. घरी परत येत असताना वांगरगाव ते उकळी बाजार रोडवर भरधाव वेगाने येणाºया अज्ञात वाहनाने त्यांच्या एमएच ३० एडी ७८४२ क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. घटनेची माहिती जखमींच्या नातेवाइकांना मिळताच घटनास्थळी धाव घेऊन त्यांना तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या अपघातात लक्ष्मण खुशाल घाटोळ हे मृत पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले, तर जखमी गजानन ओंकार पोहणकार यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविले. याबाबत मृतकाचे नातेवाइक खंडूजी श्रीराम घाटोड यांनी तेल्हारा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी भादंवि २७९, ३०४ कलमान्वये अज्ञात वाहनचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोकाँ. विजय खेकडे करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: One killed, one seriously injured in an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.