तिरोडा पंचायत समितीच्या बीडीओंविरुद्ध अकोल्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 06:18 PM2019-05-08T18:18:30+5:302019-05-08T18:18:48+5:30

जावेद शमशुद्दीन इनामदार आणि त्याची पत्नी हस्ुना जावेद इनामदार या दोघांविरुध्द बेहीशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

Offence registered against BDO of Tiroda Panchayat Samiti in Akola District | तिरोडा पंचायत समितीच्या बीडीओंविरुद्ध अकोल्यात गुन्हा दाखल

तिरोडा पंचायत समितीच्या बीडीओंविरुद्ध अकोल्यात गुन्हा दाखल

Next

अकोला - अकोला जिल्हा परिषदेचा तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि सद्या गोंदीया जिल्हयातील तिरोडा पंचायम समितीमध्ये गटविकास अधिकारी म्हणूण कार्यरत असलेल्या जावेद शमशुद्दीन इनामदार आणि त्याची पत्नी हस्ुना जावेद इनामदार या दोघांविरुध्द बेहीशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या एका व्यक्तीस १० हजार रुपयांची लाच मागीतल्या प्रकरणी तसेच ती लाच स्विकारताच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे तत्कालीन प्रमूख उत्तमराव जाधव यांनी जावेद इनामदार याला १९ आॅक्टोबर २०१५ रोजी रंगेहाथ अटक करण्यात आली होती. त्यानंतर जाधव व त्यांच्या पथकाने जावेद इनामदार याच्या सांगली मिरज येथील घराची तसेच त्याच्या कार्यालयाची झडती घेतली होती. यामध्ये दस्तावेज जप्त केल्यानंतर १ जानेवारी २००४ ते २१ आॅक्टोबर २०१४ या दहा वर्षांच्या कालावधीत वेतन आणि इतर आयपेक्षा तब्बल ७८ लाख १५ हजार ६२७ रुपयांची अपसंपदा असल्याचे उघड झाले. ही अपसंपदा इनामदारच्या कमाईपेक्षा तब्बल ८०. ८६ टक्के अधिक असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या चौकशीत उघड झाले आहे. ही बेहीशेबी मालमत्ता नावे करण्यासाठी तसेच इतर कामासाठी जावेद इनामदारला त्याची पत्नी हुस्रा इनामदार हीने सहकार्य केल्याचेही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमूख संजय गोर्ले यांनी या प्रकरणाचा अहवाल आणि तक्रार सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी जावेद इनामदार आणि त्याची हुस्रा इनामदार या दोघांविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३६/१९, क.१३(१)(इ)सहकलम १३(२) आणि भारतीय दंड विधानाच्या कलम १०९ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Offence registered against BDO of Tiroda Panchayat Samiti in Akola District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.