जीएसटीचा भरणा न जुळल्यास व्यापाऱ्यांना मिळेल नोटीस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 01:38 PM2018-05-11T13:38:22+5:302018-05-11T13:38:22+5:30

अकोला : वस्तू आणि सेवा कराचा आॅनलाइन दिलेला भरणा हिशेबात जुळून न आल्यास जीएसटी कार्यालयाच्यावतीने यापुढे नोटीस दिली जाणार आहे. 

Notice to the traders will not get GST payment! | जीएसटीचा भरणा न जुळल्यास व्यापाऱ्यांना मिळेल नोटीस!

जीएसटीचा भरणा न जुळल्यास व्यापाऱ्यांना मिळेल नोटीस!

Next
ठळक मुद्देगुजरात-दिल्लीच्या धर्तीवर आता इतरत्रही नोटीसेस मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जीएसटी रिटर्नमध्ये ही बाब अधिक स्पष्ट होत गेल्याने वित्त मंत्रालयाने हिशेब जुळविण्यास सुरुवात केली. दिल्ली-गुजरातचा कित्ता महाराष्ट्रातही लवकरच गिरविला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

अकोला : वस्तू आणि सेवा कराचा आॅनलाइन दिलेला भरणा हिशेबात जुळून न आल्यास जीएसटी कार्यालयाच्यावतीने यापुढे नोटीस दिली जाणार आहे. दरम्यान, गुजरात आणि नवी दिल्ली येथील जीएसटी आयुक्त कार्यालयांनी त्यांच्या परिसरातील व्यापारी-उद्योजकांना नोटीसेस बजावून याबाबत विचारणा केल्याने खळबळ माजली आहे. गुजरात-दिल्लीच्या धर्तीवर आता इतरत्रही नोटीसेस मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जुलैपासून जीएसटी आॅनलाइन पद्धती सुरू झाली. जीएसटीआर-वन आणि जीएसटीआर -थ्री भरणा व्यापाºयांनी केला. सुरुवातीच्या आणि शेवटच्या भरणात मोठी तफावत आढळून आली. जीएसटी रिटर्नमध्ये ही बाब अधिक स्पष्ट होत गेल्याने वित्त मंत्रालयाने हिशेब जुळविण्यास सुरुवात केली. जीएसटीचा आॅनलाइन भरणा करणाºयांची संख्या मोठी दिसत असली तरी महसूलात मात्र वाढ नसल्याचे चित्र समोर आले. यासंदर्भात दिल्लीच्या जीएसटी परिषदेच्या २७ व्या परिषदेत हा विषय चर्चेला आला. कोट्यवधीची तफावत आढळणाºया ३४ टक्के कंपन्यांना नोटीसेस देण्याचे निर्देश तेव्हाच मिळाले होते. त्याची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे. वार्षिक जीएसटी भरणा करणाºयांना यामुळे चपराक बसली आहे. गुजरात आणि दिल्लीच्या व्यापाºयांना नोटीसेस मिळाल्याने व्यापाºयांमध्ये एकच खळबळ माजली आहे. दिल्ली-गुजरातचा कित्ता महाराष्ट्रातही लवकरच गिरविला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. जीएसटीचा भरणा यापुढे जुळून आला नाही तर त्याची कारणे व्यापाºयास, करदात्यास द्यावी लागतील. जीएसटी अधिकाºयांनी आता करदात्यांची कसून चौकशी सुरू केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.

Web Title: Notice to the traders will not get GST payment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.