रस्ता दुरुस्तीसाठी कंत्राटदाराला बजावली नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, November 11, 2017 1:29am

अकोला : जुने शहरातील भीमनगर चौक ते श्रीवास्तव चौक मार्गावर बांधण्यात आलेल्या ८४ मीटर लांब रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने लावून धरल्यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाने शुक्रवारी संबंधित कंत्राटदाराला नोटीस जारी केली. नोटीसमध्ये मनपाच्या निकषानुसार रस्ता दुरुस्त करून देण्याचे निर्देश आहेत. 

प्रभाव लोकमतचा लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : जुने शहरातील भीमनगर चौक ते श्रीवास्तव चौक मार्गावर बांधण्यात आलेल्या ८४ मीटर लांब रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने लावून धरल्यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाने शुक्रवारी संबंधित कंत्राटदाराला नोटीस जारी केली. नोटीसमध्ये मनपाच्या निकषानुसार रस्ता दुरुस्त करून देण्याचे निर्देश आहेत.  जुने शहरातील भीमनगर चौक ते महाराष्ट्र टेलर ते सार्वजनिक शौचालय तसेच सार्वजनिक शौचालय ते संजय शिरसाट यांच्या घरापर्यंत एकूण ८४. ७२ मीटर लांब सिमेंट रस्त्यासाठी महापालिकेने १२ लाख रुपयांची तरतूद केली. दोन टप्प्यात बांधलेल्या सिमेंट रस्त्याचे १२ लाख रुपयांपैकी सहा लाखांचे देयक संबंधित कंत्राटदाराला मनपाच्या बांधकाम विभागाने दिवाळीपूर्वी अदा केले. सिमेंट रस्त्याचे काम अतिशय सुमार दर्जाचे झाल्याचे समोर आल्यानंतर मनपाच्या बांधकाम विभागाने धावपळ सुरू केली. रस्त्याच्या कामावर देखरेख ठेवणारे उपअभियंता सईद अहमद यांनी त्यांचे कर्तव्य किती प्रामाणिकपणे पार पाडले, याचा नमुना समोर आला आहे. शिवाय, रस्त्याची पाहणी करून अहवाल सादर करणारे कार्यकारी अभियंता अजय गुजर, शहर अभियंता इक्बाल खान यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्हे उपस्थित झाली आहेत. या प्रकरणाचा ऊहापोह झाल्यानंतर बांधकाम विभागाने तडकाफडकी मानसेवी उपअभियंता सईद अहमद यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली, तसेच कंत्राटदार प्रदीप शिरसाट यांनाही नोटीस जारी केली असून, रस्ता दुरुस्तीचे निर्देश दिले आहेत.

निकषानुसार रस्ता दुरुस्त न केल्यास.. प्रकरणाचा ऊहापोह झाल्यामुळे सुरुवातीला रस्त्यावर ‘पॅचिंग’ करून दिल्यास उर्वरित देयक अदा करण्याची भाषा वापरणार्‍या बांधकाम विभागाचा सूर आता बदलला आहे.  पॅचिंगसाठी कमी खर्च येत असल्यामुळे कंत्राटदारही राजी झाला होता; परंतु रस्त्याची दुरवस्था ध्यानात घेता कंत्राटदाराने ‘विअरिंग कोर्स’नुसार रस्ता दुरुस्त करण्यासाठी प्रशासन आग्रही आहे.  ‘विअरिंग कोर्स’नुसार रस्ता दुरुस्त न झाल्यास तो कोणत्याही क्षणी उखडण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. 

संबंधित

भुसंपादनाची गती मंदावली; समृद्धी महामार्ग निर्मितीस विलंब!, कृषी समृद्धी केंद्रांना बगल, केवळ रस्ता निर्मितीस प्राधान्य
सत्तेत असताना विरोधकांनी तिजोºयांचे सिंचन केले - मुख्यमंत्री
अभियंत्यास मारहाण प्रकरण; शिवसेना जिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल प्रकरणात गृहराज्यमंत्री केसरकर अकोल्यात
प्रहार जनशक्तीचं अकोल्यात 'जिवंत मुर्दे पूजा' आंदोलन, शासनाच्या धोरणाचा निषेध
हरभऱ्याचे पीक तुषार सिंचनावर; हिवाळी, उन्हाळी पिकांना धरणातून पाणी पुरवठा बंद

अकोला कडून आणखी

नेट बँकिंग कळणारा आता साक्षर - प्राचार्य बी.जी. शेखर
अकोल्यात पार पडलेल्या अँडव्होकेट चषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद यवतमाळ संघाला!
अकोला : जात वैधता न देणारे नऊ शिक्षक बडतर्फ
‘निगरुणा’चे पाणी पारस वीज केंद्रासाठी; ५३ किलोमीटर प्रवास करून पोहोचणार!
अकोला : सफाई कामाचे खासगीकरण नको - राम पवार

आणखी वाचा