अकोला मध्यवर्ती बसस्थानक परिसरात लागले नऊ सीसी कॅमेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 03:25 PM2018-06-22T15:25:29+5:302018-06-22T15:25:29+5:30

अकोला : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रत्येक आगारात सीसी कॅमेरे लावले जात असून, दोन दिवसांपासून अकोला मध्यवर्ती बसस्थानकही हायटेक झाले आहे.

nine cc cameras started in Akola central bus station area | अकोला मध्यवर्ती बसस्थानक परिसरात लागले नऊ सीसी कॅमेरे

अकोला मध्यवर्ती बसस्थानक परिसरात लागले नऊ सीसी कॅमेरे

Next
ठळक मुद्दे बसस्थानकावर चोºया, बॅग पळविणे आणि लुटमारीच्या घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी या कॅमेºयांची निगराणी महत्त्वाची ठरणार आहे. पीटीजेट आणि रॅटटिक या दोन प्रकारचे कॅमेरे बसस्थानकांवर लागले असून, कॅमेरा आणि त्यासंबंधी सामग्रीसाठी २६ कोटी ९१ लाख ४० हजार ६०५ रुपये खर्च करण्यात येत आहे. अकोला मध्यवर्ती बसस्थानकाच्या बाहेरची बाजू न्याहाळण्यासाठी दोन कॅमेरे गेटवर लावले गेले आहेत.

अकोला : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रत्येक आगारात सीसी कॅमेरे लावले जात असून, दोन दिवसांपासून अकोला मध्यवर्ती बसस्थानकही हायटेक झाले आहे. अकोला बसस्थानक परिसर नऊ सीसी कॅमेऱ्यांची कायम निगराणी राहत असून, बस स्थानक परिसरातील दैनंदिनी घटनांचे रेकॉर्ड गोळा होत आहेत.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने राज्यभरातील बसस्थानकांवर सीसी कॅमेरे लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, त्यावर ३६ कोटी ४१ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. खर्चातून कॅमेरा, एलईडी आणि इतर साहित्यांची खरेदी झाली असून, पाच वर्षे देखभाल दुरुस्तीही समाविष्ट आहे. संपूर्ण राज्यातील कंत्राट मे. आॅरिअन प्रो. सोल्युशन्स कंपनीला एसटी मंडळाने दिला आहे. बसस्थानकावर चोºया, बॅग पळविणे आणि लुटमारीच्या घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी या कॅमेºयांची निगराणी महत्त्वाची ठरणार आहे. पीटीजेट आणि रॅटटिक या दोन प्रकारचे कॅमेरे बसस्थानकांवर लागले असून, कॅमेरा आणि त्यासंबंधी सामग्रीसाठी २६ कोटी ९१ लाख ४० हजार ६०५ रुपये खर्च करण्यात येत आहे. त्यानंतर पाच वर्षांच्या देखभालीवर ९ कोटी ४९ लाख ९० हजार रुपये खर्च होणार आहेत. एप्रिल महिन्यात यासंदर्भात सर्व्हे करून अधिकाºयांनी कॅमेरांच्या जागा निश्चित केल्या होत्या. अकोला मध्यवर्ती बसस्थानकाच्या बाहेरची बाजू न्याहाळण्यासाठी दोन कॅमेरे गेटवर लावले गेले आहेत. यातील एक पीटीझेड कॅमेरा मध्यभागी आणि इतर सहा कॅमेरे बसस्थानकावरील विविध भागांवर लावले आहेत. त्यामुळे दोन दिवसांपासून २४ तास बसस्थानकावर या सीसी कॅमेºयांची करडी नजर भिरभिरत आहे. एक किलोमीटरपर्यंतचे अंतर सहज टिपता येईल, असे अद्ययावत कॅमेरे लावण्यात आल्याने आगार प्रमुखांचे आणि पोलिसांचे काम सोपी झाले आहे.
 

 

Web Title: nine cc cameras started in Akola central bus station area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.