कर्जमाफीत रब्बी पीक कर्ज वाटपाकडे दुर्लक्ष; अकोला जिल्हय़ात केवळ आठ कोटींचे कर्ज वाटप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 01:18 AM2018-01-20T01:18:39+5:302018-01-20T01:19:24+5:30

अकोला : रब्बी हंगामासाठी यावर्षी जिल्हय़ात ६0 कोटी ४२ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना, त्या तुलनेत १८ जानेवारीपर्यंत केवळ ८ कोटी ३१ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. त्यामुळे कर्जमाफीच्या धामधुमीत जिल्हय़ात रब्बी कर्ज वाटपाकडे कानाडोळा करण्यात आल्याची बाब समोर आली आहे.

Neglecting the debt-ridden crop loan allocation; Only 8 crore loan allocated in Akola district! | कर्जमाफीत रब्बी पीक कर्ज वाटपाकडे दुर्लक्ष; अकोला जिल्हय़ात केवळ आठ कोटींचे कर्ज वाटप!

कर्जमाफीत रब्बी पीक कर्ज वाटपाकडे दुर्लक्ष; अकोला जिल्हय़ात केवळ आठ कोटींचे कर्ज वाटप!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : रब्बी हंगामासाठी यावर्षी जिल्हय़ात ६0 कोटी ४२ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना, त्या तुलनेत १८ जानेवारीपर्यंत केवळ ८ कोटी ३१ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. त्यामुळे कर्जमाफीच्या धामधुमीत जिल्हय़ात रब्बी कर्ज वाटपाकडे कानाडोळा करण्यात आल्याची बाब समोर आली आहे.
यावर्षीच्या रब्बी हंगामात जिल्हय़ातील शेतकर्‍यांना ६0 कोटी ४२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत निश्‍चित करण्यात आले. जिल्हय़ात रब्बी पिकांच्या पेरण्या आटोपल्या असून, १८ जानेवारीपर्यंत उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ ८ कोटी ३१ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हय़ात कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे; मात्र कर्जमाफीच्या धामधुमीत रब्बी पीक कर्ज वाटपाकडे कानाडोळा करण्यात येत आहे. 
उद्दिष्टाच्या तुलनेत आतापर्यंत वाटप करण्यात आलेले रब्बी पीक कर्ज वाटपाचे प्रमाण लक्षात घेता, जिल्हय़ात ५२ कोटी ११ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप अद्याप बाकी आहे. त्यामुळे यावर्षी जिल्हय़ातील रब्बी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बँकनिहाय असे करण्यात आले कर्ज वाटप!
१८ जानेवारीपर्यंत जिल्हय़ात ८ कोटी ३१ लाख रुपयांचे रब्बी पीक कर्ज वाटप करण्यात आले. त्यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत ८ कोटी २८ हजार रुपये आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ३0 लाख ७२ हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.

रब्बी पीक कर्ज वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ६0 कोटी ४२ लाख रुपये रब्बी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून, त्यापैकी आतापर्यंत जिल्हय़ात ८ कोटी ३१ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.
-जी.जी. मावळे,
जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)

Web Title: Neglecting the debt-ridden crop loan allocation; Only 8 crore loan allocated in Akola district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती