अपारंपरिक ऊर्जा स्रोत वापर काळाची गरज - गांगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, November 11, 2017 1:13am

पारंपरिक ऊर्जा स्रोतासोबतच आता नैसर्गिक अपारंपरिक ऊर्जा  स्रोत याचा वापर करणे काळाची गरज आहे. त्यासाठी या विषयावरील  प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे तेवढेच महत्त्वाचे असून, तेव्हाच याची  जनजागृती, प्रसार होईल, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी  विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता डॉ.  चित्तरंजन गांगडे यांनी शुक्रवारी केले.

लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : पारंपरिक ऊर्जा स्रोतासोबतच आता नैसर्गिक अपारंपरिक ऊर्जा  स्रोत याचा वापर करणे काळाची गरज आहे. त्यासाठी या विषयावरील  प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे तेवढेच महत्त्वाचे असून, तेव्हाच याची  जनजागृती, प्रसार होईल, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी  विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता डॉ.  चित्तरंजन गांगडे यांनी शुक्रवारी केले. भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) दिल्ली पृरस्कृत नवनीतम  ऊर्जा व संवर्धन या विषयावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या  कृषी अभियांत्रिकी व तांत्रिक महाविद्यालयात आयोजित दहा दिवसीय  राष्ट्रीय प्रशिक्षणाचा समारोप १0 नोव्हेंबर रोजी पार पडला. त्यावेळी डॉ.  गांगडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यस्थानी याच कृषी विद्यापीठाच्या मृद  व जलसंधारण विभागाचे प्रमुख डॉ. एस. एम. टाले होते. प्रशिक्षण  संचालक डॉ. सुरेंद्र काळबांडे, महावितरणचे माजी मुख्य अभियंता  आर.एस. खंडागळे यांची प्रमुख उपिस्थती होती. डॉ. गांगडे यांनी आपल्याकडे नैसर्गिक संसाधने विपुल असल्याचे सांगत  त्याचा उपयोग करू न अपारंपरिक ऊर्जा स्रोताचा वापर करणे गरजेचे  आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अपारंपरिक ऊर्जा स्रोत  विभागाने यावर भरपूर काम केले असून, बॉयोगॅस, सोलर ड्रायर असे  अनेक तंत्रज्ञान नागरिकांना दिले. या विषयावरील राष्ट्रीय स्तरावरील  प्रशिक्षण घेऊन या विषयाची धुरा घेतली असल्याचेही ते म्हणाले. डॉ. टाले यांनी नवनीतम ऊर्जा स्रोताचा वापर करणे आवश्यक असून,  गरजेनुरू प संशोधन महत्त्वाचे आहे. त्याचे महत्त्वही त्यांनी पटवून सांगि तले. राष्ट्रीय प्रशिक्षणात देशातील पंजाब कृषी विद्यापीठ लुधियाना, बिरसा  कृषी विद्यापीठ झारखंड आदींसह देशातील २५ शास्त्रज्ञांनी सहभाग घे तला. समारोपाला डॉ. महेंद्र देशमुख, डॉ. सूचिता गुप्ता, डॉ. भाग्यश्री  पाटील, डॉ. विवेक खांबलकर, डॉ. धीरज कराळे आदींसह कृषी  अभियांत्रिकीच्या शास्त्रज्ञांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन डॉ. खांबलकर  तर आभार डॉ. पाटील यांनी केले.

संबंधित

#खामगाव कृषि महोत्सव : शेती करताना विचाराची दिशा बदला!  -  संजय उमाळे
#खामगाव कृषि महोत्सव : खरपूस रोडगे, खांडोळी, मिरचीच्या भाजीचा आस्वाद, अन् गृहोपगोयी वस्तूंची खरेदी!
रत्नागिरीत २४ पासून जिल्हा कृषी महोत्सव, पशु-पक्षी प्रदर्शन, १८ शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार
सरकारची तुटपुंजी मदत घेण्यापेक्षा मंत्र्यांना झोडपून काढा, राजू शेट्टींचा गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना सल्ला
मंत्रालयात जाळी बसवून सरकारने केली शेतक-यांच्या आत्महत्येची कुचेष्टा - रघुनाथदादा पाटील

अकोला कडून आणखी

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची आज मोटारसायकल रॅली
‘ओपन स्पेस’चे करारनामे होणार रद्द; मनपाच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधार्‍यांचा निर्णय
अकोला : मोर्णा स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद!
मूर्तिजापूर : दोन लाचखोर ‘पीएसआय’सह पोलीस कर्मचारी निलंबित
बाळापूर नागरी पतसंस्थेतील घोटाळा सहा कोटींच्या घरात

आणखी वाचा