मुंबई विद्यापीठाचे नामांतर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने करा - मधूकरराव कांबळे यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 03:33 PM2018-06-15T15:33:21+5:302018-06-15T15:38:37+5:30

अकोला : मुंबई विद्यापीठाचे नामातंर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने करावे, ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याची माहिती साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा)मधूकरराव कांबळे यांनी शुक्रवारी येथे दिली.

Name of Mumbai University in the name of Annabhau Sathe - Madhukarrao Kamble's demand | मुंबई विद्यापीठाचे नामांतर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने करा - मधूकरराव कांबळे यांची मागणी

मुंबई विद्यापीठाचे नामांतर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने करा - मधूकरराव कांबळे यांची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्दे शुक्रवार,१५जून रोजी कांबळे यांनी अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याची मागणी केली. शासनाने साडेसहाशे कोटीची तरतूद केली असून, हे भव्य स्मारक मुंबईतील घाटकोपर भागातील चिराग नगर येथे साकारणार आहे.याचा आराखडा लवकरच तयार करणार असून, त्याअगोदर चिराग नगरातील लोकांचे इमारतीमध्ये पूर्नवसन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अकोला : मुंबई विद्यापीठाचे नामातंर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने करावे, ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याची माहिती साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा)मधूकरराव कांबळे यांनी शुक्रवारी येथे दिली. त्यांनी मुंबईतील घाटकोपर भागात अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक सरकार उभारणा असल्याचेही सांगितले.
मुंबई विद्यापीठाला मॉ जिजाऊ यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेने केली असून, त्यांनतर लगेचच शुक्रवार,१५जून रोजी कांबळे यांनी अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याची मागणी केली. यासंदर्भात नामातंराच्या नव्या वादाला ही सुरू वात समजायची का असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता मुंबई विद्यापिठाला अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याची आमची जुनीच मागणी असल्याचे कांबळे यांनी सांगितले. संयुक्त महाराष्ट्रचा आवाज अण्णाभाऊ साठे यांनी बुलंद केला. कामगार,कष्टकरी,समतावादी चळवळ उभी केली. भारत-रशिया मैत्रीपूर्ण संबध त्यांनी दृढ केले. त्यांच्या अजरामर साहित्याने समाज जागृती केली,या भूमीपुत्राचे नाव मुंबई विद्यापीठाला दिल्यास विद्यापीठाचा गौरव वाढणारा आहे. म्हणून ही आमची मागणी असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे हा वादाचा विषयच नसल्यसाचे त्यांनी अधोरेखित केले. अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक बांधण्यासाठी शासनाने साडेसहाशे कोटीची तरतूद केली असून, हे भव्य स्मारक मुंबईतील घाटकोपर भागातील चिराग नगर येथे साकारणार आहे. त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय  ग्रंथालय,राष्ट्रीय व राज्य लोकसेवा आयोगाची विद्यार्थ्यांना पूर्व तयार करता यावी म्हणून, निवासी मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येईल.वातानुकूलीत सभागृह, मुला-मुलीचे वसतीगृही येथे असेल. याचा आराखडा लवकरच तयार करणार असून, त्याअगोदर चिराग नगरातील लोकांचे इमारतीमध्ये पूर्नवसन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आरक्षणाच्या मुद्दयावर त्यांनी आरक्षण अनुसूचित जातीतील एकाच मोठ्या वर्गाला मिळाले असल्याचा आरोप करीत आरक्षणाचे वर्गीकरण करू न अनुसचित जातीतील शेवटच्या घटकापर्यंत हे आरक्षण मिळाले पाहिजे यासाठीची मागणी अनेकवर्षापासून करतो आहे. याकरिता अनुसूचित जातीच्या लोकसंख्येनुसार आरक्षण असावे, यासाठीचा आमचा संघर्ष यापुढेही सुरू राहणार असल्याने त्यांनी सांगितले. जळगाव जिल्हयात दलित (मांतग)समाजाच्या मुलांनी विहिरीत आंघोळ केली म्हणून मारहाण करण्यात आली.

दलितावरील अत्याचार आणि सरकारचा संबध नाही 

दलितावरील अन्यायाचे प्रकार या सरकारमध्ये वाढले आहेत, या प्रश्नावर बोलताना त्यांनी अन्याय अत्याचार आणि सरकारचा यात काहीच संबध नसल्याचे सांगत, दलितावरील अत्याचर हजारोवर्षापासून सुरू आहेत. याचा सरकारशी संबध नसतो, यापुर्वीच्या सरकारमध्येही अत्याचार झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Web Title: Name of Mumbai University in the name of Annabhau Sathe - Madhukarrao Kamble's demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.