मुस्लीम लीग राज्यात अकोल्यासह २२ जागांवर लढणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 12:29 PM2019-03-18T12:29:15+5:302019-03-18T12:29:26+5:30

अकोला: राज्यात इंडियन मुस्लीम लीग पार्टीची पायमुळे पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष अफसर अली यांनी रविवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

Muslim League to fight 22 seats! | मुस्लीम लीग राज्यात अकोल्यासह २२ जागांवर लढणार !

मुस्लीम लीग राज्यात अकोल्यासह २२ जागांवर लढणार !

Next

अकोला: राज्यात इंडियन मुस्लीम लीग पार्टीची पायमुळे पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष अफसर अली यांनी रविवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यंदाच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत अकोल्यासह राज्यातील २२ जागांवर मुस्लीम लीग लढणार असून, दोन दिवसांत नांदेड येथून उमेदवारांची नावे घोषित करणार असल्याची माहितीदेखील त्यांनी यावेळी दिली.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर मुस्लीम लीग पार्टी महाराष्ट्रतर्फे रविवारी अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी युवा प्रदेशाध्यक्ष इम्रान अशरफी, मोहम्मद फिरोज शाह, मौलवी रहमत कार्यकारी सचिव, मौलवी हनिफ, मोहम्मद फिरोज यांच्यासह इतर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यापूर्वी इंडियन युनियन मुस्लीम लीग पार्टीने अकोला मनपाच्या विरोधी पक्षाची भूमिका यशस्वी पार पाडली होती; परंतु त्यानंतर अकोल्यात मुस्लीम लीगचे काम रोडावले होते. दरम्यानच्या काळात समाजवादी पक्ष, एमआयएम आणि इतर मुस्लीम विचारधारेच्या पक्षांनी अकोल्यात पाळेमुळे पसरविण्यास सुरुवात केली; मात्र त्यात या पक्षांना यश मिळाले नाही. परिमाणी, मुस्लीम समाज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि आता वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षांमध्ये विभागला. विविध पक्षांत विखुरलेल्या मुस्लीम समाजाला पुन्हा एक करण्यासाठी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत इंडियन युनियन मुस्लीम लीग महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. यानुषंगाने अकोल्यासह राज्यातील एकूण २२ जागांवर लढणार असल्याचे अफसर अली यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यावेळी त्यांनी अकोल्याची कमान नजीव शेख यांना सोपविली असून, त्यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी करण्यात आली.

 

Web Title: Muslim League to fight 22 seats!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.