Murthyjapur youth engineer dies in Pune | मूर्तिजापूरच्या युवा अभियंत्याचा पुण्यात आकस्मिक मृत्यू!

ठळक मुद्देमृत अभियंता प्रशांत चौधरी मुर्तिजापूरातील गणेशानगरातील रहिवासीमूर्तिजापूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार 

लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर :  शहरातील स्टेशन विभाग, गणेशनगरातील रहिवाशी प्रशांत सुरेशराव चौधरी या २८ वर्षीय  सॉफ्टवेअर अभियंत्याचा पुणे येथे आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना २ डिसेंबर रोजी घडली. त्याच्या पार्थिवावर ४ डिसेंबर रोजी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 
 तल्लख बुद्धीचा अभियंता म्हणून प्रशांत चौधरी यांची शहरात ओळख होती.   स्वत:ची कंपनी काढण्याचे  स्वप्न  बागळून  प्रशांत चौधरी  शुक्रवारी  मूर्तिजापूर येथून आई-वडील,  भाऊ,  वहिनी, लहान  पुतण्या  व  मित्रांना  भेटून  पुण्याला गेला.  सकाळी त्यांच्या आकस्मिक मृत्यूची वार्ता कळली. शनिवारी ९ वाजता रात्री  प्रशांतने  नातेवाईकांशी मोबाइलवर वार्तालाप केला. रात्री ११ वाजताच्या दरम्यान तो चक्कर येऊन खाली कोसळला.  त्याला उपचारार्थ  रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच प्रशांतचा मोठा भाऊ व मित्र मंडळी पुण्याला रवाना झालं होते. ४ डिसेंबर रोजी त्याचे पार्थिव मूर्तिजापुरात आणण्यात आल्यानंतर त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.