चिखलगाव येथील मुकेश पेंढारकर हत्याकांड : युवकाची हत्या करणार्‍या आरोपीस जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 02:30 AM2018-01-26T02:30:05+5:302018-01-26T02:30:48+5:30

अकोला : आरोपीने स्वत:च्या आईवर हल्ला करून तिला जखमी केल्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी ट्रकमध्ये नेण्यास नकार देणार्‍या युवकावरसुद्धा धारदार गुप्तीने वार करून हत्या करणारा आरोपी गोपाल जानराव सरप(३२) याला चौथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.डी. केदार यांच्या न्यायालयाने जन्मठेप आणि १0 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. 

Mukesh Pendharkar murder case in Chikhalgaon: Life imprisonment for life imprisonment of youth | चिखलगाव येथील मुकेश पेंढारकर हत्याकांड : युवकाची हत्या करणार्‍या आरोपीस जन्मठेप

चिखलगाव येथील मुकेश पेंढारकर हत्याकांड : युवकाची हत्या करणार्‍या आरोपीस जन्मठेप

Next
ठळक मुद्देआई व मित्रावरही प्राणघातक हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : आरोपीने स्वत:च्या आईवर हल्ला करून तिला जखमी केल्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी ट्रकमध्ये नेण्यास नकार देणार्‍या युवकावरसुद्धा धारदार गुप्तीने वार करून हत्या करणारा आरोपी गोपाल जानराव सरप(३२) याला चौथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.डी. केदार यांच्या न्यायालयाने जन्मठेप आणि १0 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. 
मनोज पेंढारकर याने पातूर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार त्याचा भाऊ मुकेश मधुकर पेंढारकर(२६) हा मिनी ट्रकवर चालक म्हणून काम करीत होता. सात महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. २३ डिसेंबर २0१३ रोजी चिखलगाव येथील बसस्टँडवर मुकेश हा रक्ताच्या थारोळय़ात पडला असल्याची माहिती मिळाली. मुकेश हा त्याच्या मिनी ट्रकमध्ये महावितरणचे काही साहित्य घेऊन अकोल्याला जात होता. दरम्यान, आरोपी गोपाल सरप याने त्याच्या जखमी आईला रुग्णालयात नेण्यासाठी मुकेशला विनवणी केली; परंतु मुकेशने त्याला नकार दिल्यामुळे संतप्त गोपालने त्याच्यावर गुप्तीने हल्ला केला. जखमी अवस्थेतच मुकेश पेंढारकर याला सर्वोपचार रुग्णालयात भरती केले; परंतु डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणात मनोज पेंढारकर याने पातूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी गोपाल सरप याच्याविरुद्ध भादंवि कलम ३0२ नुसार गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. तपासामध्ये आरोपी गोपालने मुकेशची हत्या करण्यापूर्वी स्वत:ची आई सुनंदा सरप आणि मित्र विलास पांडुरंग वानखडे यांच्यावरही गुप्तीने वार करून त्यांना जखमी केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याच्याकडून गुप्ती जप्त केली आणि भादंवि कलम ३0७, ३0४, आर्म अँक्ट ४, २५ नुसार गुन्हा दाखल करून गोपालला अटक केली.  सुनावणीदरम्यान न्यायालयाने १९ साक्षीदार तपासले. चार साक्षीदार फितूर झाले. 
आरोपी गोपाल सरप याच्याविरुद्ध सबळ पुरावे मिळून आल्याने, न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.  आई व मित्रावर हल्ला प्रकरणातसुद्धा न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवित कलम ३0७ मध्ये ७ वर्षांचा सश्रम कारावास, पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याचा अतिरिक्त कारावास आणि कलम ३२४ मध्ये एक वर्ष सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याच्या अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सहायक सरकारी विधिज्ञ मंगला ए. पांडे यांनी बाजू मांडली. 

आई व मित्राने घेतली आरोपीची बाजू
मुकेश पेंढारकर याच्या हत्या प्रकरणात आरोपीची आई सुनंदा सरप व मित्र विलास वानखडे यांचे जबाब पोलिसांनी नोंदविले होते; परंतु न्यायालयात मात्र या दोघांनी सुनावणीदरम्यान आरोपी गोपाल सरप याने त्यांच्यावर हल्ला केला नसल्याचे सांगितले.

अशी घडली घटना
गोपाल सरप हा मद्यपी असून, २३ डिसेंबर रोजी त्याने व मित्र विलास वानखडे यांनी सोबत मद्य प्राशन केले. विलासने अधिक मद्य प्राशन करण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. यात गोपालने विलासवर गुप्तीने वार केले. यात विलास किरकोळ जखमी झाला. त्यानंतर विलासने पातूर पोलिसात तक्रार दिली. दरम्यान, गोपालची आई सुनंदा सरप हिला गोपाल मद्यधुंद अवस्थेत बसस्टँडवर गोंधळ घालत असल्याचे कळल्यावर ती बसस्टँडवर आली आणि तिने गोपालची समजूत घातली; परंतु ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने, तिने त्याला एक थापड मारली. यामुळे संतप्त गोपालने आईवरही गुप्तीने वार करून तिला गंभीर जखमी केले. रक्तबंबाळ झालेल्या आईला रुग्णालयात दाखल करण्यासाठी तो मिनी ट्रकचालक मुकेश पेंढारकर याच्याकडे गेला आणि त्याला आईला ट्रकमधून रुग्णालयात नेण्याची विनवणी करू लागला; परंतु मुकेशने त्याला नकार दिल्याने, त्याने त्याच्यावरही गुप्तीने वार केले आणि त्याची हत्या केली. 

Web Title: Mukesh Pendharkar murder case in Chikhalgaon: Life imprisonment for life imprisonment of youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.