अकोल्यातील महाविद्यालयांमध्ये महावितरणने मोबाईल अ‍ॅप, आॅनलाईन व विविध सेवेसंदर्भात केली जनजागृती

By atul.jaiswal | Published: November 3, 2017 05:24 PM2017-11-03T17:24:55+5:302017-11-03T17:27:47+5:30

महावितरणने आधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत  ग्राहकांसाठी उपलब्ध केलेल्या विविध सेवा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी अकोला परिमंडळाच्यावतीने अधिकाºयांनी थेट संवाद साधीत अकोला येथील विविध महाविद्यालयांमध्ये कार्यशाळांच्या माध्यमातून जागृती केली .

MSEDCL has created awareness among students about the mobile app, online and various services. |  अकोल्यातील महाविद्यालयांमध्ये महावितरणने मोबाईल अ‍ॅप, आॅनलाईन व विविध सेवेसंदर्भात केली जनजागृती

 अकोल्यातील महाविद्यालयांमध्ये महावितरणने मोबाईल अ‍ॅप, आॅनलाईन व विविध सेवेसंदर्भात केली जनजागृती

Next
ठळक मुद्दे विविध महाविद्यालयांमध्ये कार्यशाळा. विद्यार्थी व उपस्थितांनी विचारलेल्या शंका व प्रश्नांची उत्तरे देण्यात आली.


अकोला : ग्राहकांना तत्पर व घरबसल्या चांगली सेवा मिळावी म्हणून महावितरणने आधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत  ग्राहकांसाठी उपलब्ध केलेल्या विविध सेवा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी अकोला परिमंडळाच्यावतीने अधिकाºयांनी थेट संवाद साधीत अकोला येथील विविध महाविद्यालयांमध्ये कार्यशाळांच्या माध्यमातून जागृती केली .
      अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर यांच्या संकल्पनेनुसार महावितरणच्या विविध सेवांची माहिती थेट ग्राहकांना व्हावी म्हणून महाविद्यालयांमध्ये कार्यशाळांच्या माध्यमातून जागृती करण्यात आली. यामध्ये अकोला येथील श्रीमती ल.रा.तो. वाणिज्य महाविद्यालय, सीताबाई कला महाविद्यालय, व रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालय येथे कार्यशाळा घेण्यात येऊन विद्यार्थी व प्राध्यापक वृन्द यांना  महावितरणच्या विविध सेवांची माहिती देण्यात आली. यामध्ये मोबाईल अ‍ॅॅप, आॅनलाइन वीज भरणा, मोबाईल क्रमांक नोंदणी व त्याचे फायदे, ग्राहकसेवा केंद्र, कॉल सेंटर, विज बचत व विद्युत सुरक्षा, कनेक्शन आॅन कॉल अशा विविध सुविधा सेवांची माहितीचा समावेश होता. सोबतच यावेळी विद्यार्थी व उपस्थितांनी विचारलेल्या शंका व प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. श्रीमती ल.रा.तो. वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीप्रभू चापके यांनी उपक्रमाचे कौतुक करीत महावितरणच्या आॅनलाइन सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.  या संवाद कार्यक्रमात अकोला परिमंडलाचे  वरिष्ठ व्यवस्थापक राहुल पन्हाळे, प्रणाली विश्लेषक सचिन राठोड, उपविधी अधिकारी सुनिल उपाध्ये, जनसंपर्क अधिकारी विकास आढे, सहाय्य अभियंता राजेश अहिर, उपव्यवस्थापक गुरमितसिंह गोसल, गणेश भंडारी, सहाय्यक अनुदेशक अभिजीत मते यांनी संवाद साधीत विविध विषयांची माहिती दिली.  सदर उपक्रमाकरीता महाविद्यालयाचे विश्वस्त, प्राचार्य व प्राध्यापक वृन्द यांनी सहकार्य केले. 

Web Title: MSEDCL has created awareness among students about the mobile app, online and various services.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.