खासदार संजय धोत्रे  यांची अकोला, वाशिम जिल्ह्यातील गारपीटग्रस्त गावांना भेट, नुकसानाची केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 05:35 PM2018-02-13T17:35:54+5:302018-02-13T17:53:41+5:30

खासदार संजय धोत्रे हे अकोला-वाशिम जिल्‍ह्यात आपदग्रस्‍त गावांचा सतत तीन दिवसापासून दौरा करीत आहेत.

MP Sanjay Dhotre visited hailstorm affected villages | खासदार संजय धोत्रे  यांची अकोला, वाशिम जिल्ह्यातील गारपीटग्रस्त गावांना भेट, नुकसानाची केली पाहणी

खासदार संजय धोत्रे  यांची अकोला, वाशिम जिल्ह्यातील गारपीटग्रस्त गावांना भेट, नुकसानाची केली पाहणी

googlenewsNext
ठळक मुद्देअकोला-वाशिम जिल्‍ह्यात खासदार संजय धोत्रे हे आपदग्रस्‍त गावांचा सतत तीन दिवसापासून दौरा करीत आहेत. वाशिम जिल्‍ह्यातील मालेगांव, रिसोड तालुक्‍यातील केनवट, गणेशपुर, कोयाळी, जोगेश्‍वरी, नेतन्‍सा, महागांव इत्‍यादि अनेक गावात जाऊन नुकसानाची पाहणी केली. नैसर्गीक आपत्‍तीचे सर्वेक्षण, पंचनामे तसेच वित्‍तीय हानीचे अहवाल शासनास तातडीने सादर करण्‍यासाठी जिल्‍हा प्रशासनास खासदार संजय धोत्रे यांनी सुचना दिल्‍या आहेत.

 अकोला:  विदर्भ-मराठवाड्यामध्‍ये मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस व गारपीटीमुळे शेतक-यांचे कोट्यावधीचे नुकसान तसेच काही प्रमाणात जिवीतहानी सुध्‍दा झाली. आता तोंडाशी आलेले रब्‍बी पीक नष्‍ट झाले यापुर्वीच खरीप हंगामात पोळून निघालेला शेतकरी पुन्‍हा रब्‍बी हंगामात नैसर्गीक संकटात सापडला या नैसर्गीक आपत्‍तीमध्‍ये सापडलेल्‍या शेतक-यांना सर्वतोपरी दिलासा देण्‍यासाठी अकोला-वाशिम जिल्‍ह्यात खासदार संजय धोत्रे हे आपदग्रस्‍त गावांचा सतत तीन दिवसापासून दौरा करीत आहेत. नैसर्गीक आपत्‍तीचे सर्वेक्षण, पंचनामे तसेच वित्‍तीय हानीचे अहवाल शासनास तातडीने सादर करण्‍यासाठी जिल्‍हा प्रशासनास खासदार संजय धोत्रे यांनी सुचना दिल्‍या आहेत. गहू हरबरा फळझाडे केली रब्‍बी पिके लिंबू या सर्व नुकसानी बाबत खासदार धोत्रे यांनी दुरध्‍वनीद्वारे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्‍याचे कृषि मंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर, महसुल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्‍या सोबत सविस्‍तर चर्चा करून संकटग्रस्‍त शेतक-यांना तातडीने मदत तसेच आवश्‍यक पुर्नवसन करण्‍याची मागणी केली. दिनांक १३/०२/२०१८ रोजी वाशिम जिल्‍ह्यातील मालेगांव, रिसोड तालुक्‍यातील केनवट, गणेशपुर, कोयाळी, जोगेश्‍वरी, नेतन्‍सा, महागांव इत्‍यादि अनेक गावात जाऊन नुकसानाची पाहणी केली. सदर पाहणी दौ-यात तहसीलदार रिसोड  सुरळकर, तहसीलदार राजेश वजिरे, मालेगांव कृषि अधिकारी तसेच संबंधीत सर्व अधिकारी उपस्‍थीत होते तसेच जिल्‍ह्यातील व तालुक्‍यातील भाजपा पदाधिकारी तालुका अध्‍यक्ष तानाजी पवार, वाशिम जिल्‍हा भाजपा उपाध्‍यक्ष मारोतराव लादे, शंकररावजी बोरकर, संतोष गर्जे, प्रशांत देशमुख, रिसोड तालुका अध्‍यक्ष बाबुराव पाटील जाधव,केशवराव बाजड, अमोल नरवाडे, साहेबराव वाळूकर, जतराव खराटे, संजय जाधव, वामनराव बाजड, अर्जुनराव बाजड, ज्ञानबा बाजड, अभिमन्‍यू महाराज, संतोष मवाळ, गजाननराव काळे, भगवान गायकवाड आदि ग्रामस्‍थ उपस्थित होते.

Web Title: MP Sanjay Dhotre visited hailstorm affected villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.