मोर्णा स्वच्छता मोहिम: जिल्हाधिकारी एसडीओ, तहसिलदारांनी दिले एक दिवसाचे वेतन

By atul.jaiswal | Published: January 16, 2018 05:31 PM2018-01-16T17:31:54+5:302018-01-16T17:35:51+5:30

अकोला : यासाठी खारीचा वाटा म्हणून जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदारांनी एक दिवसाचे वेतन या मोहिमेसाठी समर्पित केले आहे.

Morna Cleanliness Campaign: District Collector SDO, Tahsildar gave one day's salary | मोर्णा स्वच्छता मोहिम: जिल्हाधिकारी एसडीओ, तहसिलदारांनी दिले एक दिवसाचे वेतन

मोर्णा स्वच्छता मोहिम: जिल्हाधिकारी एसडीओ, तहसिलदारांनी दिले एक दिवसाचे वेतन

Next
ठळक मुद्दे १३ जानेवारी रोजी ‘मोर्णा स्वच्छता मिशन’ राबविण्यात आले. लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदारांनी एक दिवसाचे वेतन या मोहिमेसाठी समर्पित केले आहे.

अकोला : शहराच्या मध्यभागातून वाहणारी मोर्णा नदी स्वच्छ करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरु केलेल्या ‘मोर्णा स्वच्छता मिशन’ला विविध संस्था, संघटना व सामान्य अकोलकरांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. नदीला नवसंजीवनी देणाºया या मोहिमेत प्रशासकीय अधिकारीही तन-मन-धनाने सहकार्य करीत आहेत. यासाठी खारीचा वाटा म्हणून जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदारांनी एक दिवसाचे वेतन या मोहिमेसाठी समर्पित केले आहे.
मोर्णा नदी स्वच्छतेसाठी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका व विविध स्वयंसेवी संस्था आणि संघटनांच्यावतीने १३ जानेवारी रोजी ‘मोर्णा स्वच्छता मिशन’ राबविण्यात आले. लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाºयांनी या मोहिमेला सहकार्य केले आहे. अकोला, अकोट, बाळापूर व मुर्तीजापूर येथील उपविभागीय अधिकारी, अकोला, अकोट, बाळापूर, तेल्हारा, पातूर, बार्शीटाकळी, मुर्तीजापूर या तालुक्यांचे तहसिलदार, जिल्हा खनिकर्म अधिकारी, संजय गांधी योजना तहसिलदार यांनी त्यांच्या एक दिवसाचे वेतन या मोहिमेसाठी समर्पित करीत असल्याचे पत्र मंगळवारी जिल्हाधिकाºयांना सादर केले. यावर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनीही स्वत:चे एक दिवसाचे वेतन या मोहिमेसाठी देत असल्याचा शेरा लिहिला.

पालकमंत्र्यांनी केली कामाची पाहणी
या पृष्ठभूमीवर लोकसहभागातून करण्यात आलेल्या मोर्णा नदी स्वच्छता कामाची पाहणी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक एम.राकेश कलासागर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस.रामामूर्ती, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे, तहसीलदार राजेश्वर हांडे उपस्थित होते. मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेमुळे नदीचे पात्र जलकुंभी व कचरामुक्त झाल्याने पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेच्या कामात मिळालेला नागरिकांचा सहभाग आणि प्रशासनाचे कौतुक करीत, भविष्यात मोर्णा नदी विकासासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले. मोर्णा नदी स्वच्छतेसाठी लोकांनी दिलेला प्रतिसाद कौतुकास्पद होता. त्यामुळे यापुढेही दर शनिवारी लोकसहभागातून मोर्णा नदी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून, मोर्णा नदी स्वच्छ होईपर्यंत स्वच्छता मोहीम सुरूच राहणार असल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले.

Web Title: Morna Cleanliness Campaign: District Collector SDO, Tahsildar gave one day's salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.