मूर्तिजापूर तालुक्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस;  उमा, पिंपळशेंडा प्रकल्प 'ओव्हर-फ्लो'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 04:18 PM2018-08-21T16:18:57+5:302018-08-21T16:22:08+5:30

मूर्तिजापूर (जि. अकोला ):  तालुक्यात १६ अॉगष्ट पासून सुरु असलेल्या संततधार पावसाने पुर्णा, काटेपूर्णा, उमा आणि कमळगंगा नद्यांना पूर आला असून, दोन उमा आणि पिंपळशेंडा जल प्रकल्पांनी पातळी ओलांडली असल्याने सांडव्यातून विसर्ग होत आहे.

More than average rainfall in Murtijapur taluka; Uma, Pimpalsenda Project 'Over-Flow' | मूर्तिजापूर तालुक्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस;  उमा, पिंपळशेंडा प्रकल्प 'ओव्हर-फ्लो'

मूर्तिजापूर तालुक्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस;  उमा, पिंपळशेंडा प्रकल्प 'ओव्हर-फ्लो'

Next
ठळक मुद्दे तालुक्यातील किनखेड येथील ८ ते ९,घरे सांजापूर येथील २ घरे ,सोनेरी येथील १,बपोरी १,राजूरा १,उमरी १ घरांच्या भिंती पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत १५६.६७ टक्के पाऊस झाला असून, २४ तासात २९.० मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे.तालुक्यात असलेले उमा व पिंपळशेंडा हे जल प्रकल्प पूर्णत: भरले असल्याने सांडव्यातून १० सेमी. विसर्ग होत आहे.

- संजय उमक
मूर्तिजापूर (जि. अकोला ):  तालुक्यात १६ अॉगष्ट पासून सुरु असलेल्या संततधार पावसाने पुर्णा, काटेपूर्णा, उमा आणि कमळगंगा नद्यांना पूर आला असून, दोन उमा आणि पिंपळशेंडा जल प्रकल्पांनी पातळी ओलांडली असल्याने सांडव्यातून विसर्ग होत आहे. नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याचे सांगितले आहे. तर १६४० हेक्टरवरील शेती पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून, अनेक घरांची पडझड झालेल्याने संसार उघडय़ावर आला आहे.पावसामुळे जनजीवनावर अधिक परीणाम झाला आहे.
      संततधार सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने घरे पडली आहे.  तर काही गावांचा संपर्क तुटला आहे.   तालुक्यातील किनखेड येथील ८ ते ९,घरे सांजापूर येथील २ घरे ,सोनेरी येथील १,बपोरी १,राजूरा १,उमरी १ घरांच्या भिंती पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. घरांच्या भींती पडल्या तर काही घरे पुर्णत: पडल्याने त्यांची इतरत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
   तालुक्यात आतापर्यंत सरासरी पाऊस झाला आहे. जुन ते सप्टेंबर पर्यंत पावसाची अपेक्षित वार्षीक सरासरी ७४२.८० आहे ही सरासरी अॉगष्ट मध्येच ओलांडून आजपर्यंत सरासरी नुसार ८३०.२ येवढा पाऊस झाला आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत १५६.६७ टक्के पाऊस झाला असून, २४ तासात २९.० मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे.
     संततधार सुरू असलेल्या पावसाने तालुक्यातील १६४० हेक्टर क्षेत्रावरील पिकाची नासाडी होऊन मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या संबंधीचा अहवाल शनिवारी जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आला. तर पडलेल्या घरांचे सर्वेक्षण चालू आहे.      तालुक्यात असलेले उमा व पिंपळशेंडा हे जल प्रकल्प पूर्णत: भरले असल्याने सांडव्यातून १० सेमी. विसर्ग होत आहे. तर शिवण प्रकल्प ६१.५ टक्के भरला आहे.

तालुक्यातील उमा व पिंपळशेंडा हे दोन्ही प्रकल्प शंभर टक्के भरले असून ओव्हरफ्लो झाले आहे तर शिवण प्रकल्प ६१,५ टक्के भरला आहे. उपरोक्त दोन्ही प्रकल्पातून मंगळवार सकाळी १३:३० वाजता पासून १० सेमी. सांडव्यातून विसर्ग होत असल्याने नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याचा ईशारा देण्यात आला आहे.
- प्रदीप पाटील
शाखा अभियंता, उमा प्रकल्प, मूर्तिजापूर.

Web Title: More than average rainfall in Murtijapur taluka; Uma, Pimpalsenda Project 'Over-Flow'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.