सातव्या वेतनासाठी पैसा, शेतकऱ्यांसाठी नाही हेच दुर्दैव - ज्ञानेश वाकुडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 01:26 PM2018-12-29T13:26:45+5:302018-12-29T13:27:44+5:30

अकोला : राष्ट्रसंतांनी ग्रामीण विकासावर भर दिला तर सध्याचे शासनकर्ते शहर विकासावर भर देत आहेत. आम्हाला मेट्रो, स्मार्ट सिटी ...

 Money for Seventh pay commision, Not for Farmers - Unfortunately - Gnyesh Wakuddkar | सातव्या वेतनासाठी पैसा, शेतकऱ्यांसाठी नाही हेच दुर्दैव - ज्ञानेश वाकुडकर

सातव्या वेतनासाठी पैसा, शेतकऱ्यांसाठी नाही हेच दुर्दैव - ज्ञानेश वाकुडकर

googlenewsNext


अकोला: राष्ट्रसंतांनी ग्रामीण विकासावर भर दिला तर सध्याचे शासनकर्ते शहर विकासावर भर देत आहेत. आम्हाला मेट्रो, स्मार्ट सिटी नकोत; त्यापेक्षा शेतकºयांचे कर्ज माफ करा. त्यांच्या शेतमालाला भाव द्या; परंतु या शासनाकडे सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी पैसा आहे, शेतकºयांसाठी नाही. हे दुर्दैव आहे, असा आरोप प्रसिद्ध कवी व लोकजागर अभियानाचे ज्ञानेश वाकुडकर यांनी येथे केला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीतर्फे स्वराज्य भवन प्रांगणात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव शुक्रवारपासून सुरू झाला. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी राष्ट्रसंतांच्या अधिष्ठानाचे व प्रतिमेचे पूजन करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. स्वागताध्यक्ष म्हणून प्रा. नितीन बाठे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आ. बबनराव चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज, महादेवराव भुईभार, अ‍ॅड. रामसिंग राजपूत, गुलाबराव महाराज, तिमांडे महाराज, मधुकरराव सरप, कृष्णा अंधारे, रवींद्र मुंडगावकर, शिवप्रकाश रुहाटिया, सावळे गुरुजी, सचिन महल्ले, अ‍ॅड. वंदन कोहाडे, अ‍ॅड. श्रीदेवी साबळे, प्रा. डॉ. ममता इंगोले आदी उपस्थित होते.
ज्ञानेश वाकुडकर म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी राज्यघटना लिहिली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दूरदृष्टीने गावाच्या, शेतकºयांच्या, समाजाच्या कल्याणासाठी समाजघटना म्हणजे ग्रामगीता लिहिली. गीतेपेक्षाही ग्रामगीता महत्त्वाची आहे. गाव हा विश्वाचा नकाशा... गावावरून देशाची परीक्षा...असे राष्ट्रसंतांनी म्हटले आहे; परंतु शासनकर्ते त्याउलट काम करीत आहेत. सध्या देशातील परिस्थिती गंभीर आहे. ७0 टक्के जनता खेड्यात राहते. आर्थिक व्यवस्था शेतीवर अवलंबून असतानाही शासन गावांकडे दुर्लक्ष करते. शेतकºयांवर आत्महत्या करण्याची वेळ का आली,असे सांगत वाकुडकर म्हणाले की, शेतकºयांची कर्जमाफी, शेतमालाला भाव देण्यापेक्षा शासनाला सातवा वेतन आयोग लागू करणे महत्त्वाचे वाटते. यापेक्षा दुसरे दुर्दैव कोणते असू शकते. समाजाने जागरूक होऊन राष्ट्रसंताच्या विचारांनुसार अनुकरण केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविक सेवा समितीचे अध्यक्ष बलदेवराव पाटील यांनी केले. मान्यवरांचे स्वागत शेख रऊफ गुरुजी, गजानन काकड, रामरतन घावट, डॉ. अशोक रत्नपारखी, डॉ. त्र्यंबक आखरे, सुभाष भिसे, मधुकर आखरे, धनंजय ढोरे, मुकेश वाकोडे, खानझोडे, प्रांजली गीते, कोमल हरणे, अ‍ॅड. संतोष भोरे, शुभम वरणकार, सुरेश राऊत, गजानन म्हैसने यांनी केले. संचालन शिवाजी म्हैसने यांनी केले.

घराघरांत ग्रामगीतेची गरज- सत्यपाल महाराज
सध्याचा जमाना ‘बोले तैसा चाले’चा नाही. साºया चोरांचा भरणा आहे. लोकं कीर्तनाला येत नाहीत. त्यासाठी भंडारा ठेवावा लागतो. दिवसा अगरबत्ती, रात्री जबरदस्ती करणाºया बुवा, महाराजांच्या नादी लोकं लागतात; परंतु राष्ट्रसंतांचे विचार ऐकण्यासाठी कोणी येत नाही. देहाची तिजोरी, दारू त्यात ठेवा...उघड बार देवा आता...अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे चांगला विचार, आचार आणि संस्कार रुजविण्यासाठी घराघरांत ग्रामगीतेची गरज असल्याचे सांगत, सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराजांनी, शासकीय कर्मचाºयांसाठी शासनाने सातवा वेतन आयोग लागू केला. चांगली गोष्ट आहे; परंतु शेतकºयांसाठीसुद्धा शासनाने ठोस धोरण हाती घेण्याची गरज आहे, असे मत मांडले.

राष्ट्रसंतांचे विचार क्रांतिकारक - प्रा. बाठे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सर्वच बाबींचा अंतर्भाव करून ग्रामगीतेची निर्मिती केली. ग्रामगीतेत सांगितलेले त्यांचे विचार क्रांती निर्माण करणारे आहेत. त्यांच्या भजनांनी चीन, पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात देशवासीयांमध्ये चेतना, देशभक्ती जागविण्याचे काम केले, असे सांगत महोत्सवाचे स्वागताध्यक्ष प्रा. नितीन बाठे यांनी, ग्रामगीतेमध्ये ग्रामविकास, कृषी, शिक्षण आणि युवकांच्या विकासाचा मंत्र दिला. ग्रामगीतेचा विचार आत्मसात करण्याची खरी गरज सध्याच्या परिस्थिती असल्याचे त्यांनी स्वागतपर भाषणात सांगितले.


डॉ. नानासाहेब चौधरी यांना जीवनकार्य गौरव पुरस्कार प्रदान
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समिती व कालुराम रुहाटिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे यंदा प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. रामचंद्र उपाख्य नानासाहेब चौधरी यांना मान्यवरांच्या हस्ते जीवनकार्य गौरव पुरस्कार व मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी शिवप्रकाश रुहाटिया, श्रीप्रकाश रुहाटिया उपस्थित होते. मानपत्राचे वाचन अ‍ॅड. संतोष भोरे यांनी केले.

 

Web Title:  Money for Seventh pay commision, Not for Farmers - Unfortunately - Gnyesh Wakuddkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.