लग्न केलेले प्रेमी युगुल पोहोचले पोलीस ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 01:38 PM2018-09-11T13:38:24+5:302018-09-11T13:38:30+5:30

अकोला : पळून जाऊन लग्न केलेले प्रेमी युगुल स्वसंरक्षणासाठी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात सोमवारी पोहोचले होते.

A married couple reached the police station | लग्न केलेले प्रेमी युगुल पोहोचले पोलीस ठाण्यात

लग्न केलेले प्रेमी युगुल पोहोचले पोलीस ठाण्यात

Next

अकोला : पळून जाऊन लग्न केलेले प्रेमी युगुल स्वसंरक्षणासाठी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात सोमवारी पोहोचले होते. यावेळी युवतीचे व युवकाच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. अशावेळी त्यांना धीर देणे अपेक्षित होते; मात्र पोलिसांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली.
खामगाव येथील एक युवती अकोल्यातील चिखलपुरा येथील एका युवकाच्या प्रेमात पडली. दोघेही आंतरजातीय असल्याने युवतीच्या कुटुंबीयांकडून विरोध असणे स्वाभाविक होते. दोघेही सज्ञान असल्याने ते घरून पळून गेले, त्यानंतर लग्न करून ते सोमवारी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात पोहचले. मात्र, युवती हरवल्याची तक्रार खामगाव पोलीस ठाण्यात असल्याने सिव्हिल लाइन्स पोलिसांनी हात वर केले आणि खामगाव पोलिसांना कळवले. तसेच घटनेची माहिती युवतीच्या पालकांनाही देण्यात आली. त्यानुसार तेही सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात धडकले होते.

 

Web Title: A married couple reached the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.