मालेगाव तालुक्यात शिक्षक गुंतले विद्यार्थ्यांच्या शोधात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 03:22 PM2018-05-11T15:22:25+5:302018-05-11T15:22:25+5:30

पटसंख्या कायम राखून नोकरी टिकवण्यासाठी व अतिरिक्त न ठरण्यासाठी मालेगाव तालुक्यातील शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या शोधात गुंतले असल्याचे दिसून येते. 

Malegaon teachers engaged student searchin | मालेगाव तालुक्यात शिक्षक गुंतले विद्यार्थ्यांच्या शोधात !

मालेगाव तालुक्यात शिक्षक गुंतले विद्यार्थ्यांच्या शोधात !

Next
ठळक मुद्देग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी खासगी शाळांमध्ये जात आहेत. विद्यार्थी मिळत नसल्यामुळे शाळा बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.सध्या विद्यार्थी मिळवण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांच्या शोधात फिरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मालेगाव : बदलत्या शिक्षण प्रवाहामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शहराकडे ओघ वाढत असल्यामुळे ग्रामीण भागातील शाळांतील विद्यार्थी पटसंख्या कमी होत आहे. दरम्यान, पटसंख्या कायम राखून नोकरी टिकवण्यासाठी व अतिरिक्त न ठरण्यासाठी मालेगाव तालुक्यातील शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या शोधात गुंतले असल्याचे दिसून येते. 

बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रातही आमुलाग्र बदल होत आहे. पूर्वीच्या तुलनेत आता शहरी भागातील शाळांना विद्यार्थी व पालक प्राधान्य देत असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातील पालकांनाही आपली मुले इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये शिकावी असे वाटू लागले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी खासगी शाळांमध्ये जात आहेत. याचा परिणाम गावातील मराठी शाळांवर होत आहे. विद्यार्थी मिळत नसल्यामुळे शाळा बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.  त्यामुळे शाळेची मान्यता, नोकºया टिकवण्यासाठी शिक्षकांना पटसंख्या कायम राखणे गरजेचे झाले आहे. निकालानंतर काही दिवसातच शहरातील शाळांमधील प्रवेश हाउसफुल्ल झाल्याने शहरात मर्यादेपेक्षा जास्त विद्यार्थी घेण्यास शाळांचा नकार मिळत आहे. तर दुसरीकडे काही जिल्हा परिषद शाळांमधील तुकड्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे सध्या विद्यार्थी मिळवण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांच्या शोधात फिरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विद्यार्थी मिळविण्यासाठी विविध आमिषेही पालकांना दाखविली जात आहे. पटसंख्या टिकवून ठेवण्यासाठी शिक्षकांसमोर पाचवी व आठवीचे विद्यार्थी मिळविणे हे उद्दिष्ट आहे. एकदा विद्यार्थ्यांने पाचवीत प्रवेश घेतला की दहावीपर्यंत अडचण येत नाही. म्हणूनच विद्यार्थी मिळविण्यासाठी शिक्षकांमध्ये चांगलीच स्पर्धा दिसून येत आहे. 

Web Title: Malegaon teachers engaged student searchin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.