‘मै भी चौकीदार’ अभियान: रणजित पाटील, संजय धोत्रेही झाले ‘चौकीदार’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 04:11 PM2019-03-20T16:11:26+5:302019-03-20T16:11:31+5:30

अकोला: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मै भी चौकीदार’ या अभियानाचा प्रारंभ केल्यावर भाजपाच्या अनेक नेते, पदाधिकाऱ्यांसह, भाजपाच्या चाहत्यांनी आपल्या टिष्ट्वटर हॅण्डलच्या नावापुढे ‘चौकीदार’ लिहिणे सुरू केले.

'Mai bhi choukidar' campaign: Ranjeet Patil, Sanjay Dhotre also became 'choukidar'! | ‘मै भी चौकीदार’ अभियान: रणजित पाटील, संजय धोत्रेही झाले ‘चौकीदार’!

‘मै भी चौकीदार’ अभियान: रणजित पाटील, संजय धोत्रेही झाले ‘चौकीदार’!

Next

अकोला: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मै भी चौकीदार’ या अभियानाचा प्रारंभ केल्यावर भाजपाच्या अनेक नेते, पदाधिकाऱ्यांसह, भाजपाच्या चाहत्यांनी आपल्या टिष्ट्वटर हॅण्डलच्या नावापुढे ‘चौकीदार’ लिहिणे सुरू केले. त्याला प्रतिसाद देत अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासह खासदार संजय धोत्रे हेसुद्धा टिष्ट्वटर चौकीदार झाले आहेत; मात्र पश्चिमी वºहाडातील इतर भाजपा आमदार मात्र चौकीदार होण्यापासून बेखबरच असल्याचे समोर आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात चौकीदार या शब्दाला महत्त्व प्राप्त झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात वारंवार येणारा उल्लेख तो म्हणजे मी देशाचा पंतप्रधान नसून, चौकीदार आहे. जो देशाचे संरक्षण आणि तिजोरीचे रक्षण करण्यासाठी जनतेचा सेवक म्हणून पदावर आहे; मात्र नीरव मोदी, विजय मल्ल्या आणि अनिल अंबानी यांना राफेलचे कंत्राट दिल्यावरून काँग्रेसने नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार कॅम्पेन उघडले. याच चौकीदार शब्दाचा काँग्रेसकडून पुरेपूर प्रचारात वापर करण्यात आला. ‘चौकीदार चोर है’ या घोषणेने राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देत भाजपाने ‘मै भी चौकीदार’ हे अभियान सुरू केले असून, त्याला सोशल मीडियामध्ये प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेचा भाग होत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील व खासदार संजय धोत्रे यांनी आपल्या टिष्ट्वटर हॅण्डलचे नाव बदलत समोर चौकीदार अ‍ॅड केले आहे.
आमदारांमध्ये केवळ संजय कुटेच चौकीदार, इतर अनभिज्ञ
‘मै भी चौकीदार’ या अभियानाच्या अनुषंगाने पश्चिम वºहाडातील प्रमुख भाजपा नेत्यांच्या टिष्ट्वटर हॅण्डलच्या आढावा घेतला असता बुलडाण्यातील जळगाव जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे वगळता एकाही आमदारांच्या टिष्ट्वटर हॅण्डलचे नाव बदलेले आढळून आले नाही. अकोल्यातील आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, वाशिममधील आमदार राजेंद्र पाटणी, लखन मलिक, बुलडाण्यातील आमदार चैनसुख संचेती, आमदार आकाश फुंडकर हे अजूनही चौकीदार होण्यापासून बेखबरच आहेत. विशेष म्हणजे, भाजपाचे जिल्हाध्यक्षही या अभियानाबाबत अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे.

 

Web Title: 'Mai bhi choukidar' campaign: Ranjeet Patil, Sanjay Dhotre also became 'choukidar'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.