Lok Sabha Election 2019: १४ उमेदवारांनी केली ३९ अर्जांची उचल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 03:35 PM2019-03-22T15:35:10+5:302019-03-22T15:35:20+5:30

अकोला : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची अधिसूचना मंगळवार, १९ मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Lok Sabha Election 2019: 14 candidates take the 39 applications! | Lok Sabha Election 2019: १४ उमेदवारांनी केली ३९ अर्जांची उचल!

Lok Sabha Election 2019: १४ उमेदवारांनी केली ३९ अर्जांची उचल!

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची अधिसूचना मंगळवार, १९ मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दुसऱ्या दिवशी (बुधवारी ) अपक्ष उमेदवार मुरलीधर लालसिंग पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, १४ उमेदवारांनी ३९ नामनिर्देशनपत्राची उचल केली आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख २६ मार्च आहे.
नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी एबी फॉर्म देणे आवश्यक आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळी वरील सर्व बाबींची पूर्तता करून नामनिर्देशनपत्र दाखल करावे, अशा सूचना आहेत. दरम्यान, प्रमुख राजकीय पक्षाने आपल्या एकाही उमेदवाराचे नाव घोषित केले नसल्याने निवडणुकीची रणधुमाळी अजूनही वेगवान झालेली नाही. काँग्रेसच्या उमेदवारीचा घोळ सुरू असून, भाजपा तसेच वंचित बहुजन आघाडीने आपले पत्ते खुले केले नसल्याने या पक्षांच्या उमेदवारीची प्रतीक्षाच आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019: 14 candidates take the 39 applications!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.