चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या वृध्दास जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 05:46 PM2019-02-02T17:46:58+5:302019-02-02T17:47:24+5:30

अकोला:  बोरगाव मंजु पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अन्वी मिर्झापूर येथील रहिवासी एका अल्पवयीन चिमुक लीवर बलात्कार करणाºया ७५ वर्षीय वृध्दास जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Life imprisonment old man who raped a minor girl | चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या वृध्दास जन्मठेप

चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या वृध्दास जन्मठेप

Next

अकोला:  बोरगाव मंजु पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अन्वी मिर्झापूर येथील रहिवासी एका अल्पवयीन चिमुक लीवर बलात्कार करणाºया ७५ वर्षीय वृध्दास जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासोबतच त्याला दंडही ठोठावण्यात आला असून चिमुकलीच्या आईला शिवीगाळ केल्याप्रकरणीही दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
अन्वी मिर्झापूर येथील रहिवासी अ. अजीज लालमीया देशमूख (७५) या वृध्दाने त्याच्या घराजवळच राहत असलेल्या एका पाच वर्षीय चिमुकलीवर ९ जानेवारी २०१७ रोजी जबरी संभोग केला होता. घडलेला प्रकार आई कींवा कुटुंबीयांना सांगीतल्यास चिमुकलीला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामूळे घाबरलेल्या चिमुकलीने एक दिवस हा प्रकार कुटुंबीयांना सांगीतला नाही. मात्र त्रास असहय झाल्यानंतर तीच्या आईच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी बोरगाव मंजु पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन पोलिसांनी अ. अजीज लालमीया देशमूख याच्याविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६, ५०४, ५०६ आणि पोक्सो कायद्याच्या कलम ५ आणि ६ नुसार गुन्हा दाखल केला होता. बोरगाव मंजु पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पुर्ण करून दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायालयाने ९ साक्षीदार तपासल्यानंतर आरोपी अ. अजीज लालमीया देशमूख याच्याविरुध्द आढळलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे तसेच पोलिसांचा योग्य तपास लक्षात घेता आरोपी अ. अजीज लालमीया देशमूख याला पोक्सो कायद्याच्या कलम ५ आणि ६ अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास आणखी सहा महिन्यांच्या अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले. चिमुकलीच्या आईला शिवीगाळ प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला.

Web Title: Life imprisonment old man who raped a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.