पातूर तालुक्यातील कोठारी परिसरात बिबट्याचा धूडगूस, गाभण गाईचा पाडला फडशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 02:35 PM2017-12-02T14:35:44+5:302017-12-02T14:47:47+5:30

शिर्ला (जि. अकोला): पातुर तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या कोठारी गावात शुक्रवारी सायंकाळी एका बिबट्याने धुमाकूळ घालत, एका गाभण गाईची शिकार केली. जि.प.प्राथ.शाळेनजी प्रल्हाद महादेव खुळे यांच्या गाभण गाईंचा बिबट्याने फडशा पाडला

leopard hunt a cow in Kothari area of ​​Tapur taluka | पातूर तालुक्यातील कोठारी परिसरात बिबट्याचा धूडगूस, गाभण गाईचा पाडला फडशा

पातूर तालुक्यातील कोठारी परिसरात बिबट्याचा धूडगूस, गाभण गाईचा पाडला फडशा

Next
ठळक मुद्दे डोंगराळ भागात तीन बिबट्यांचा वावर ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण

- संतोषकुमार गवई
शिर्ला (जि. अकोला): पातुर तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या कोठारी गावात शुक्रवारी सायंकाळी एका बिबट्याने धुमाकूळ घालत, एका गाभण गाईची शिकार केली. जि.प.प्राथ.शाळेनजी प्रल्हाद महादेव खुळे यांच्या गाभण गाईंचा बिबट्याने फडशा पाडला
गेल्या काही दिवसांपासून डोंगरालगतच्या भागांमध्ये बिबट्यांचा वावर आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
डोंगरालगतच्या गावांमध्ये रात्रीच्या वेळी भारनियमन आणि पथदिव्यांच्या अभावामुळे अंधाराचं साम्राज्य असते याचाच फायदा घेत गावालगत येण्याची हिम्मत बिबट करतात.त्यामळे जनावरांसह माणसांचा जीव धोक्यात आला आहे
येथील शिक्षक बाजीराव तायडे ह्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसरात एक नव्हे तर तीन बिबट्यांचा वावर आढळून आला आहे. इतर ग्रामस्थांनीही याला दुजोरा दिला आहे.
वनविभागाच्या अधिकाºयांनी परीसरात गस्त वाढवावी, नागरिकांमध्ये असलेली भीती घालवण्यासाठी समुपदेशन करावं अशी मागणी समोर आली आहे.

Web Title: leopard hunt a cow in Kothari area of ​​Tapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.