Lal Singh's murder case was investigated by the Bashrttali police! | लालसिंग हत्याकांडाचा तपास बाश्रीटाकळी पोलिसांकडून काढला!
लालसिंग हत्याकांडाचा तपास बाश्रीटाकळी पोलिसांकडून काढला!

ठळक मुद्देराजनखेड येथील शेतकरी लालसिंग भगा राठोड यांची ६ डिसेंबर रोजी शेतात गळा चिरून हत्या करण्यात आली होतीदोन महिन्यांचा कालावधी उलटल्यावरही बाश्रीटाकळी पोलिसांना अद्याप आरोपींविषयी धागेदोरे मिळाले नसल्याने बाश्रीटाकळी पोलिसांकडून हा तपास काढण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : बार्शिटाकळी तालुक्यातील राजनखेड येथील शेतकरी लालसिंग भगा राठोड यांची ६ डिसेंबर रोजी शेतात गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात दोन महिन्यांचा कालावधी उलटल्यावरही बार्शिटाकळी पोलिसांना अद्याप आरोपींविषयी धागेदोरे मिळाले नसल्याने बार्शिटाकळी पोलिसांकडून हा तपास काढण्यात आला. मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी या हत्याकांडाचा तपास करणार आहेत.
लालसिंग राठोड व त्यांची पत्नी, मुलगी शेतात कापूस वेचण्यासाठी ६ डिसेंबर २0१७ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास गेल्या होत्या, मुलगी व पत्नी घरी परतल्या मात्र लालसिंग राठोड हे शेतातच थांबले होते. ते रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांची शोधाशोध करण्यात आली. यावेळी त्यांचा मृतदेह शेतात रक्ताच्या थारोळय़ात दिसून आला होता. त्यानंतर मृतक राठोड यांचा मुलगा किरण राठोड याने बाश्रीटाकळी पोलीस ठाणे गाठून पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी मुलगा किरणच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३0२ नुसार गुन्हा दाखल केला होता. सुरुवातीला पोलिसांनी गावातील नाभरे व एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तसेच मृतकाची मुलगी व पत्नीवर पोलिसांचा संशय होता. त्या दिशेने पोलिसांनी तपासही केला होता. मात्र पोलिसांना आरोपीविरुद्ध ठोस पुरावे न मिळाल्याने आरोपींना पकडता आले नाही. 
त्यामुळे राठोड यांची हत्या कुणी केली, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. दोन महिने उलटले तरीही आरोपी पकडल्या न गेल्याने मृतक राठोड यांची पत्नी व मुलगा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. दरम्यान, पोलीस अधीक्षकांनी त्यांची मागणी मान्य करीत बार्शिटाकळी पोलिसांकडून तपास काढून घेतला आहे. बाश्रीटाकळी पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने आता हा तपास मूर्तिजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे दिला आहे.


Web Title: Lal Singh's murder case was investigated by the Bashrttali police!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.