विदर्भातील पिकांवर किडींचे आक्रमण सुरू च!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 01:35 AM2017-08-23T01:35:52+5:302017-08-23T01:36:29+5:30

अकोला : विदर्भात पाऊस आला; पण काही भागात त्याचा जोर कमी असल्याने किडींचा प्रादुर्भाव कमी झाला नाही. मान्सूनपूर्व कपाशी गुलाबी बोंड अळीने आक्रमण केले आहे. या अळीचा ताबडतोब बंदोबस्त न केल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. सोयाबीनवर चक्रीभुंगा, स्पोडोप्टोरा व हेलीओकर्पा नावाच्या किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. या सर्व विषम परिस्थितीमुळे शेतकर्‍यांचा कीटकनाशकांचा खर्च वाढला आहे.

Kidney invasion of crops in Vidarbha started! | विदर्भातील पिकांवर किडींचे आक्रमण सुरू च!

विदर्भातील पिकांवर किडींचे आक्रमण सुरू च!

Next
ठळक मुद्देकीटकनाशकांचा खर्च वाढलागुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन करण्याचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : विदर्भात पाऊस आला; पण काही भागात त्याचा जोर कमी असल्याने किडींचा प्रादुर्भाव कमी झाला नाही. मान्सूनपूर्व कपाशी गुलाबी बोंड अळीने आक्रमण केले आहे. या अळीचा ताबडतोब बंदोबस्त न केल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. सोयाबीनवर चक्रीभुंगा, स्पोडोप्टोरा व हेलीओकर्पा नावाच्या किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. या सर्व विषम परिस्थितीमुळे शेतकर्‍यांचा कीटकनाशकांचा खर्च वाढला आहे.
यावर्षी पावसाने दडी मारल्याने तब्बल ४0 ते ५0 दिवस उशिरा शेतकर्‍यांना पेरणी करावी लागली. तुरळक पावसाच्या भरवशावर काही भागातील पिके तरली आहेत. वाढणारे तापमान आणि मध्येच निर्माण होणारे ढगाळ वातावरण पिकांवरील विविध किडींना पोषक ठरत आहे. मान्सूनपूर्व कपाशीवर पांढर्‍या माशीचा प्रादुर्भाव दिसत असून, गुलाबी बोंड अळीने चाल केली आहे. नियमित खरीप हंगामातील बीटी कपाशीवर गुलाबी बोंड अळी व रसशोषक किडींनी आक्रमण केले असून, फुलकिडेही उदयास आले आहेत.

कापूस बोंडाची झाली डोमकळी!
मान्सूनपूर्व पेरणी केलेल्या कपाशीवर या अळीचा प्रादुर्भाव जुलैच्या शेवटच्या तसेच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासूनच पात्या आणि फुलांवर आले. या अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढल्यास कपाशीची फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात, यालाच डोमकळी म्हटले जाते. कपाशीची बोंडे धरायला सुरुवात झाली, की या अळीचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त हिरव्या बोंडामध्ये होतो. 

काळजी घ्या! 
कोरडवाहू कपाशीमध्ये हा प्रादुर्भाव ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच हिरव्या बोंड अळीमध्ये होण्याची शक्यता असते, त्यामुळे प्रतिकूल परिणाम होऊन कपाशीची प्रत बिघडते. बोंडातील अळ्या रुईमधून छिद्र करू न सरकी खात असल्याने रुईची प्रत व सरकीतील तेलाचे प्रमाण खालावते, तसेच बियाण्यांची उगवणशक्ती कमी होते. त्यामुळे शेतकर्‍यांनी काळजी घेण्याची गरज आहे. 

 मान्सूनपूर्व कपाशीवर काही ठिकाणी पांढरी माशी आली असून, नियमित खरीप हंगामातील बीटी कपाशीवर गुलाबी बोंड अळी व रस शोषण करणार्‍या कि डींचा प्रादुर्भाव दिसून आला आहे, तसेच सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा व हेलीओकर्पा आला आहे. या किडींचा बंदोबस्त एकीकृत व्यवस्थापन कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार करण्याची गरज आहे. शेतकर्‍यांनी दररोज शेताचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. 
- डॉ. धनराज उंदिरवाडे,  विभाग प्रमुख, कीटकशास्त्र 
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.
-

Web Title: Kidney invasion of crops in Vidarbha started!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.