आज सुटणार पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात सिंचनाचा तिढा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 01:58 AM2017-11-20T01:58:25+5:302017-11-20T02:09:59+5:30

तेल्हारा : तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी वरदान ठरलेले वारी हनुमान येथील धरण  यावर्षी शंभर टक्के भरले आहे. प्रशासनाने धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचा घाट  घातला आहे. त्याला तालुक्यातील शेतकर्‍यांनी विरोध सुरू केला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी २0 नोव्हेंबर रोजी सकाळी १0 वाजता अकोला येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात अधिकार्‍यांची बैठक होणार आहे.

Irkarna's work at the irrigation department's office today? | आज सुटणार पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात सिंचनाचा तिढा?

आज सुटणार पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात सिंचनाचा तिढा?

Next
ठळक मुद्देशेतकरी, वान प्रकल्प अधिकार्‍यांची अकोल्यात बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी वरदान ठरलेले वारी हनुमान येथील धरण यावर्षी शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना सिंचनासाठी पाणी मिळेल, अशी  आशा होती; मात्र प्रशासनाने धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचा घाट  घातला आहे. त्याला तालुक्यातील शेतकर्‍यांनी विरोध सुरू केला आहे. यावर  तोडगा काढण्यासाठी २0 नोव्हेंबर रोजी सकाळी १0 वाजता शेतकरी व पाटबंधारे  विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक अकोला येथील पाटबंधारे विभागाच्या  कार्यालयात होणार आहे. या बैठकीत सिंचनाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. 
यावर्षी वान धरण १00 टक्के भरले आहे. सुरुवातीला कमी पाऊस झाल्याने मूग,  उडीद, सोयाबीनचे उत्पादन घटले. कपाशीवर बोंडअळी आल्याने ते पीकही शे तकर्‍यांना घेता आले नाही. शेतकर्‍यांनी हरभरा पेरणीसाठी शेती तयार करून ठेवली  आहे; मात्र त्यासाठी वानच्या अधिकार्‍यांनी पाणी सोडले नाही. पाणी सोडण्यासाठी  तीन वेळा शेतकर्‍यांच्या बैठका घेण्यात आल्या; परंतु काही लोकप्रतिनिधींनी वानचे  पाणी अकोल्यात पळविण्याचा घाट घताल्याने शेतकर्‍यांना अजूनही पाणी मिळाले  नाही. याबाबत शेतकर्‍यांची बैठक अकोला येथे ठेवण्यात आली आहे. या बैठकीत  शेतकर्‍यांना न्याय मिळणार की शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली जाणार, याकडे तेल्हारा तालुक्याचे लक्ष लागले आहे. 

Web Title: Irkarna's work at the irrigation department's office today?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.