जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प; तलावांची तपासणी करा - जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 02:35 PM2019-07-09T14:35:40+5:302019-07-09T14:35:44+5:30

तलाव व लघुसिंचन प्रकल्पांची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी संबंधित विभागांना दिले.

Inspect the Tanks, Irrigation Project in the District - Collector's Directions | जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प; तलावांची तपासणी करा - जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश 

जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प; तलावांची तपासणी करा - जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश 

Next

अकोला: अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना म्हणून पाटबंधारे विभागांतर्गत जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्प व जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत तलाव व लघुसिंचन प्रकल्पांची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी संबंधित विभागांना दिले.
जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या सुरक्षितेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित अधिकाºयांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त संजय कापडणीस, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, लघुसिंचन जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्याम बोके, सहायक अभियंता अभिजित नितनवरे, शाखा अभियंता अनिल राठोड, नयन लोणारे, जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचे शाखा अभियंता एस.जी. चव्हाण, महावितरणचे अधीक्षक अभियंता कछोट उपस्थित होते.
जिल्ह्यातील धरणांच्या भिंती व परिसर, धरणांचे गेट, सांडव्यावरून होणारा जलप्रवाह, धरणांच्या पायथ्याशी गावांना असलेला धोका, धरणांच्या गेटचे संचलन करण्यासाठी पूर्ण क्षमतेने विद्युत पुरवठा करणे या प्राथमिक बाबींसंदर्भात तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी संबंधित विभागाला दिले. तसेच जिल्हा परिषद लघुसिंचन विभागांतर्गत असलेल्या १९ तलावांची तपासणी करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाºयांनी दिले. धरणांच्या गेटचे संचलन करण्यासाठी पूर्ण क्षमतेने व पूर्ण वेळ विद्युत पुरवठा करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी विद्युत विभागाला दिल्या.

पूर परिस्थिती उद्भवणाऱ्या गावांत उपाययोजना करा!
धरणांच्या पायथ्याशी असलेल्या गावांत सांडव्यावरून वाहणारे पाणी गावात शिरल्याने पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असल्याची खातरजमा करून, आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या बैठकीत दिले.

लघुसिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीची कामे करा!
लघुपाटबंधारे प्रकल्पांचे बांध फुटण्याच्या घटना होत असतात. त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी लघुसिंचन प्रकल्पांची तातडीने पाहणी करून उपाययोजना करण्याचे सांगत, प्रकल्पांच्या किरकोळ दुरुस्तीची कामे जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.

 

Web Title: Inspect the Tanks, Irrigation Project in the District - Collector's Directions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.