गुरांची अवैध वाहतुक ; बाळापूरात पोलीस उपनिरीक्षकांना वाहनाखाली चिरडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 04:59 PM2017-12-27T16:59:08+5:302017-12-27T17:03:37+5:30

बाळापूर : रात्री गस्त घालत असलेले बाळापूरचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी यांनी मार्गावर नाकेबंदी करीत असताना भरधाव वाहन अडविण्याचा प्रयत्न केला असता वाहनचालकाने त्याचे वाहन विठ्ठल वाणी यांच्या अंगावर घालून त्यांना बाजुला खाली पडले.

Illegal transportation of cattle; Attempt to crush the police sub-inspector under the vehicle in the child | गुरांची अवैध वाहतुक ; बाळापूरात पोलीस उपनिरीक्षकांना वाहनाखाली चिरडण्याचा प्रयत्न

गुरांची अवैध वाहतुक ; बाळापूरात पोलीस उपनिरीक्षकांना वाहनाखाली चिरडण्याचा प्रयत्न

googlenewsNext
ठळक मुद्देमार्गावर नाकाबंदी करणाऱ्या उपनिरीक्षकास गुरांची अवैध वाहतुक करणाऱ्यांनी वाहनाखाली चिरडण्याचा प्रयत्न केला.यामध्ये घटनेमध्ये पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली.वाणी यांनी पिस्तुल काढून आरोपीवर रोखून दोन्ही आरोपींसह वाहन बाळापूर पोलीस स्टेशनला आणले.

बाळापूर : मूर्तिजापूरकडून दोन प्रवासी वाहनांमध्ये अवैध गुरांची वाहतूक केली जात असल्याच्या गुप्त माहितीवरून अकोलाचे उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने यांनी २६ डिसेंबरच्या रात्री एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने एक वाहन पकडले. परंतु दुसºया वाहनचालकाने पोलिसांना चकवून भरधाव वेगाने बाळापूरकडे वाहन दामटले. ही माहिती अकोलाच्या पोलीस नियंत्रण कक्षाने बाळापूर पोलिसांना दिली. या माहितीवरून रात्री गस्त घालत असलेले बाळापूरचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी यांनी मार्गावर नाकेबंदी करीत असताना भरधाव वाहन अडविण्याचा प्रयत्न केला असता वाहनचालकाने त्याचे वाहन विठ्ठल वाणी यांच्या अंगावर घालून त्यांना बाजुला खाली पडले. त्यावेळी त्या भारधाव वाहनाचा पाठलाग करून बाळापूर शहरात पोलिसांनी सदर वाहनाला घेरून पकडले. यामध्ये घटनेमध्ये पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली.
परप्रांतातून अमरावती मार्गे गुरांची वाहतूक करण्यासाठी अमरावतीमधील मंगेश रमेश वानखडे यांच्या एमएच २२ डी २५५५ क्रमांकाच्या दोन प्रवासी वाहनामध्ये पाच गुरे भरून ती बाळापूरमध्ये पोहोचवण्यासाठी चालक शे. अजीज शे. वजीर (३५) व शे. एहेसान शे. अमन (३३) रा. लाल ताजनगर, अमरावतीवरून रात्री उशिरा निघाले. ही माहिती अकोला उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने यांना मिळाल्याने त्यांनी मंगळवारी रात्री ४ वाजता नाकेबंदीत एक वाहन अकोल्याला पकडले. या कारवाईच्या वेळेस तेथून पळ काढलेल्या वाहनाने बाळापूरजवळ नाकाबंदी करणाºया पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी यांच्या अंगावर वाहन नेऊन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाणी जीव वाचवताना वाणी गंभीर जखमी झाले. त्यांनी जखमी अवस्थेतही पळून जाणाºया वाहनाचा पाठलाग सुरू केला असता त्यांचे पोलीस वाहन उलटता-उलटता वाचले. पसार झालेले वाहन बाळापुरात जाताच दोन्ही बाजुने पोलिसांच्या वाहनांनी लाल सवारी परिसरात सदर वाहन पकडले. यानंतरही त्यातील दोन आरोपी पोलिसांवर हल्ला करण्याच्या तयारीत होते.पोलीस कर्मचाºयांची संख्या कमी असल्याने पोलीस उपनिरीक्षक वाणी यांनी शेवटी त्यांच्याजवळील पिस्तुल काढून आरोपीवर रोखून दोन्ही आरोपींसह सदर वाहन बाळापूर पोलीस स्टेशनला आणले व उपरोक्त दोन्ही आरोपींना अटक केली. पाचही गुरांची सुटका करून उपचारासाठी गोशाळेत पाठविले. याबाबत पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दखल प्रक्रिया सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Illegal transportation of cattle; Attempt to crush the police sub-inspector under the vehicle in the child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.