हॉटमिक्स प्लान्ट : कंपनीसह शेतमालकास २.५५ लाखांचा दंड!

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, February 10, 2018 2:03am

अकोला : बोरगाव मंजू शिवारात भाड्याने घेतलेल्या शेतात अकृषक  परवानगी न घेता, विनापरवाना ‘हॉटमिक्स डांबर प्लान्ट’ उभारणार्‍या पुणे येथील इंटरबिल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपनीसह संबंधित शेतमालकास २ लाख ५५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत असल्याचा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) संजय खडसे यांनी शुक्रवारी दिला. त्यानुसार कंपनीसह शेतमालकास संयुक्तरीत्या दंडाची रक्कम १५दिवसांत जमा करावी लागणार आहे.

संतोष येलकर ।  लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : बोरगाव मंजू शिवारात भाड्याने घेतलेल्या शेतात अकृषक  परवानगी न घेता, विनापरवाना ‘हॉटमिक्स डांबर प्लान्ट’ उभारणार्‍या पुणे येथील इंटरबिल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपनीसह संबंधित शेतमालकास २ लाख ५५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत असल्याचा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) संजय खडसे यांनी शुक्रवारी दिला. त्यानुसार कंपनीसह शेतमालकास संयुक्तरीत्या दंडाची रक्कम १५दिवसांत जमा करावी लागणार आहे. ‘हॉटमिक्स डांबर प्लान्ट’ उभारण्यासाठी  बोरगाव मंजू येथील शेत सर्व्हे नं. २९१/२ अ आणि २९१/ २ ब मधील कमलकिशोर कन्हैयालाल अग्रवाल व जुगलकिशोर अग्रवाल यांची शेतजमीन पुणे येथील इंटरबिल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपनीमार्फत भाड्याने घेण्यात आली.  भाड्याने घेतलेल्या २.३६ आर. जमिनीवर संबंधित कंपनीमार्फत ‘हॉटमिक्स डांबर प्लान्ट’ उभारण्यात आला; परंतु, भाड्याने घेण्यात आलेल्या जमिनीवर हॉटमिक्स प्लान्ट सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अकृषक परवानगी घेण्यात आली नाही.  त्यामुळे विनापरवाना ‘हॉटमिक्स प्लान्ट’ उभारण्यात  आल्याचे वृत्त गत ६ जानेवारी रोजी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले होते.  या वृत्ताची दखल घेत, विनापरवाना उभारण्यात आलेल्या हॉटमिक्स डांबर प्लान्टची चौकशी करून, अहवाल  सादर करण्याचा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी अकोला तहसीलदारांना गत ६ जानेवारी रोजी दिला होता. त्यानुषंगाने यासंदर्भात महसूल मंडळ अधिकार्‍यांमार्फत चौकशी करून, चौकशीचा अहवाल अकोल्याचे तहसीलदार राजेश्‍वर हांडे यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे सादर केला होता. चौकशी अहवालाच्या आधारे अकृषक परवानगी न घेता हॉटमिक्स प्लान्ट उभारणार्‍या संबंधित कंपनीसह शेतमालकास २ लाख ५५ हजार रुपये दंड आकारण्यात येत असल्याचा आदेश उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी ९ फेब्रुवारी रोजी दिला. दंडाची रक्कम १५ दिवसांत संबंधित कंपनीसह शेतमालकाने संयुक्तरीत्या जमा करावयाची आहे,  असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

अकृषक परवानगी न घेता उभारण्यात आलेल्या ‘हॉटमिक्स डांबर प्लान्ट’ संदर्भात करण्यात आलेल्या चौकशीचा अहवाल अकोला तहसीलदारांकडून प्राप्त झाला आहे. प्राप्त अहवालानुसार अकृषक परवानगी न घेता हॉटमिक्स प्लान्ट उभारणार्‍या कंपनीसह संबंधित शेतमालकास संयुक्तरीत्या २ लाख ५५ हजार रुपये दंड आकारण्यात येत असल्याचा आदेश देण्यात आला आहे. - संजय खडसे   उपविभागीय अधिकारी, अकोला.

संबंधित

नोंदणीकृत भाडेकरारनामा असेल तरच मिळणार २५ टक्के कोट्यात प्रवेश!
मोर्णाच्या विकासासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहायक, सुरक्षारक्षकांकडून आर्थिक मदत
वीज बिलावरील पत्त्याच्या दुरुस्तीसाठी महावितरणची विशेष मोहीम
भामट्याने सेवानिवृत्त शिक्षकाची दुचाकी पळवीली
अकोल्यात बिल्डिंग पेंटर बांधकाम मजूर संघटनेने काढला मोर्चा 

अकोला कडून आणखी

पोलिसांच्या रात्रगस्तीला आता ‘शीघ्र प्रतिसाद दल’
आंबेडकरांशी आघाडीला प्राधान्य, अन्यथा उमेदवार तयार
सत्ता स्थापन करताना आश्वासनांची खैरात; आता भाजपला रामराज्याचा विसर - खा. सावंत
 रस्ते कामांचा अहवाल मनपा आयुक्त, अधीक्षक अभियंत्यांकडे!
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मागितले प्रस्ताव!

आणखी वाचा