झांबड पिता-पुत्राच्या जामीन अर्जावरील सुनावणी सोमवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, November 11, 2017 1:15am

लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : शासनाच्या मालकीचा २0 कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळय़ात  मुख्य आरोपी असलेल्या दीपक झांबड व त्याचे पिता रमेश गजराज  झांबड यांच्या अटकपूर्व नियमित जामीन अर्जावरील मंगळवारी असलेली  सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता १३ नोव्हेंबर रोजी  त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.  शहरातील २0 कोटी रुपये किमतीच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : शासनाच्या मालकीचा २0 कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळय़ात  मुख्य आरोपी असलेल्या दीपक झांबड व त्याचे पिता रमेश गजराज  झांबड यांच्या अटकपूर्व नियमित जामीन अर्जावरील मंगळवारी असलेली  सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता १३ नोव्हेंबर रोजी  त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.  शहरातील २0 कोटी रुपये किमतीच्या ३ हजार ७१७.१७ चौरस मीटर  भूखंडाचे हस्तलिखित दस्तावेज नसताना तालुका भूमी अभिलेख विभागा तील अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या संगनमताने गजराज गुदडमल  मारवाडी यांच्या नावे संगणकात ऑनलाइन नोंद घेऊन हा भूखंड कागदो पत्री हडपण्यात आला. हे प्रकरण ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणले,  तसेच पाठपुरावा केला. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार  झाल्यानंतर तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे आला. त्यांनी तपास पूर्ण करून  भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक योगेश कुळकर्णी यांच्या  तक्रारीवरून दीपक रमेश झांबड व रमेश गजराज झांबड यांच्यासह भूमी  अभिलेख विभागाचे अधिकारी-कर्मचार्‍यांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या  कलम ४२0, ४६७, ४६८, ४७१, १२0 ब, आयटी अँक्ट कलम ६५  नुसार गुन्हा दाखल के ला होता. या प्रकरणात दीपक झांबड व रमेश झांबड  यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने  त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला. त्यांच्या नियमित जामीन अर्जावर  शुक्रवारी न्यायालयात सुनावणी होणार होती; परंतु ही पुन्हा पुढे ढकलण्या त आली. आता दोघांच्या जामीन अर्जावर १३ नोव्हेंबर रोजी सुनावणी  होण्याची शक्यता आहे.

संबंधित

कामशेत पोलिसांची कामगिरी : वेश बदलून मध्य प्रदेशातून चोरट्यांना केली अटक
‘बीएमएस’ परीक्षा : पेपरफुटीप्रकरणी दहा अटकेत, कॉलेजचा कर्मचारी मुख्य आरोपी, सहा विद्यार्थ्यांचाही समावेश
भाजपा नगरसेवक तुषार कामठेला अटक, बनावट कागदपत्रांच्या आधारे निवडणूक लढल्याचं प्रकरण
कुख्यात गुंड नीलेश घायवळला अटक :नगरसेवकाला मागितली दरमहा लाखाची खंडणी
चेसिस नंबर बदलून ट्रेलर्सची चोरी, नवी मुंबईच्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला अटक : नऊ ट्रेलर हस्तगत

अकोला कडून आणखी

सर्वोपचार रुग्णालयातून बालकाच्या अपहरणाचा प्रयत्न; चौकशी समिती गठित
अकोला जिल्ह्यातील ६१० वर्गातील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी विषय शिक्षकच नाहीत!
अकोला जिल्ह्यातील खदानींच्या उत्खननाची खनिकर्म संचालनालयामार्फत तपासणी!
अकोला जिल्ह्यात ‘जलयुक्त शिवार’च्या १७९२ कामांना तांत्रिक मान्यता
सर्वोपचार रुग्णालयाच्या एनआयसीयूमधून बाळ पळविण्याचा प्रयत्न

आणखी वाचा