रूग्णांच्या ‘हाकेला ओ’ देणारा आरोग्य दूत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 02:04 AM2018-01-12T02:04:14+5:302018-01-12T02:04:32+5:30

अकोला :  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालय असो,  जिल्हा स्त्री रुग्णालय असो किंवा इतर कोणतेही खासगी रुग्णालय.. या ठिकाणी रुग्णांना घेऊन येणार्‍या गाव-खेड्यांमधील भोळय़ा-भाबळय़ा नागरिकांना जेव्हा काहीच सुचेनासे होते, तेव्हा त्यांची मदत करण्यास येथील एक ध्येयवेडा आरोग्य दूत सदैव तयार असतो.

Health messenger giving patients 'call' | रूग्णांच्या ‘हाकेला ओ’ देणारा आरोग्य दूत!

रूग्णांच्या ‘हाकेला ओ’ देणारा आरोग्य दूत!

Next
ठळक मुद्दे१0 वर्षांपासून करतोय समाजकार्य

अतुल जयस्वाल। 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला :  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालय असो,  जिल्हा स्त्री रुग्णालय असो किंवा इतर कोणतेही खासगी रुग्णालय.. या ठिकाणी रुग्णांना घेऊन येणार्‍या गाव-खेड्यांमधील भोळय़ा-भाबळय़ा नागरिकांना जेव्हा काहीच सुचेनासे होते, तेव्हा त्यांची मदत करण्यास येथील एक ध्येयवेडा आरोग्य दूत सदैव तयार असतो.  जात, धर्म,  पंथ असा कोणताही भेद न करता गरजू रुग्णांना मदत करण्यातून आत्मिक आनंद मिळविणार्‍या या ध्येयवेड्या तरुणाचे नाव आहे, पराग रामकृष्ण गवई.
शासकीय रुग्णालयांमध्ये भरती असलेल्या गरजू रुग्णास रक्ताची गरज असो किंवा डॉक्टरांची मदत.. एक फोन करा.. पराग मदतीला धावून येतो. समाजकार्याचा वसा घेतलेला पराग हा गत दहा वर्षांपासून सवरेपचार रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय या ठिकाणी गाव-खेड्यांमधून येणार्‍या रुग्णांना सर्व प्रकारची मदत करीत आहे. मानवी रक्ताला दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे केवळ रक्तदानातून ही गजर पूर्ण करता येते, हे चांगल्याप्रकारे ओळखून असलेला पराग हा रक्तदान शिबिरांचे आयोजन करून, सवरेपचार रुग्णालयाच्या रक्तपेढीला मदत करतो. त्याने आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने आतापर्यंत २८ वेळा रक्तदान शिबिरे आयोजित केली आहेत. एवढेच नव्हे, तर त्याने स्वत: ३३ वेळा रक्तदान करून रुग्णांचे प्राण वाचविले आहेत. 
याशिवाय गावागावांमध्ये जाऊन तेथील युवकांना रक्तदान शिबिरे घेण्यासाठी पराग प्रोत्साहित करतो. त्याच्या प्रोत्साहनामुळे गतवर्षी ग्रामीण भागात १६ ठिकाणी रक्तदान शिबिरे घेण्यात आली.  दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त परागचे सहकारी अशोक वाटिका येथे रक्तदान शिबिर घेतात. 
सवरेपचार रुग्णलयात भरती असलेल्या रुग्णांनाही पराग मदत करतो. परागच्या या सेवाभावी  वृत्तीमुळे सवरेपचारमधील डॉक्टरही त्याला मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतात. लोकांची सेवा करण्याचे ब्रिद घेतलेल्या पराग गवईचा अनेक सामाजिक संस्थांनी गौरव केला आहे.  पराग हा रुग्णांच्या मदतीसोबतच गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यातही नेहमीच पुढे असतो.
भारिप-बमसंचा सामान्य कार्यकर्ता म्हणून समाजकार्य करणारा पराग जिल्हा शांतता समितीचाही सदस्य असून, सामाजिक सलोखा ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतो. प्रत्येकाशी विन्रमतेने संवाद साधणार्‍या परागचा लाघवीपणा त्याच्या सेवा कार्याला संस्मरणीय करतो.

दीडशे रक्तदात्यांची फळी
पराग गवई हा मुख्यत्वे रक्तदानाच्या क्षेत्रात कार्यरत असून, यासाठी तो जीवाचे रान करीत आहे. त्याच्याकडे विविध रक्तगट असलेल्या दीडशे युवक-युवतींची फळी आहे. गरज पडल्यास तरुण रक्तदात्यांची ही फळी रक्तदानासाठी सदैव तत्पर असते. सवरेपचार रुग्णालयात एखाद्या रुग्णाला रक्ताची गरज भासली व तो रक्तगट रक्तपेढीकडे उपलब्ध नसला, तर डॉक्टर परागला हव्या असलेल्या रक्तगटाबाबत सांगून त्याला मदत करण्याबाबत सांगतात.

Web Title: Health messenger giving patients 'call'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.