अकोल्यात पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता दरबाराला उत्स्फुर्त प्रतिसाद; एकूण  ९६ तक्रारी प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 06:44 PM2018-01-22T18:44:53+5:302018-01-22T18:46:27+5:30

अकोला: मागील काही महिन्यापासून दर सोमवारी असणा-या पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या   जनता दरबारात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून   आज सोमवार दि.२२ जानेवारी  रोजी झालेल्या जनता दरबारात विविध विभागाच्या एकुण  ९६ क्रारी प्राप्त झाल्या आहेत.

The Guardian Minister Janata Darbar; A total of 9 6 complaints received | अकोल्यात पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता दरबाराला उत्स्फुर्त प्रतिसाद; एकूण  ९६ तक्रारी प्राप्त

अकोल्यात पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता दरबाराला उत्स्फुर्त प्रतिसाद; एकूण  ९६ तक्रारी प्राप्त

Next
ठळक मुद्देसोमवार दि.२२ जानेवारी  रोजी झालेल्या जनता दरबारात विविध विभागाच्या एकुण  ९६ क्रारी प्राप्त झाल्या आहेत.सर्व विभागप्रमुखांना जनतेच्या तक्रारीचा १५ दिवसाच्या आत निपटारा करावा असे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले. विभागप्रमुखांनी कटाक्षांने लक्ष देवून त्यांच्या समस्या सोडवाव्यात , अशा सुचना त्यांनी दिल्यात. 

अकोला: मागील काही महिन्यापासून दर सोमवारी असणा-या पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या   जनता दरबारात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून   आज सोमवार दि.२२ जानेवारी  रोजी झालेल्या जनता दरबारात विविध विभागाच्या एकुण  ९६ क्रारी प्राप्त झाल्या आहेत. सर्व विभागप्रमुखांना जनतेच्या तक्रारीचा १५ दिवसाच्या आत निपटारा करावा असे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले आज पालकमंत्री  यांच्या जनता दरबाराचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात  करण्यात आले होते.

            यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस रामामुर्ती, अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर, निवासी उपजिल्हाधिकारी  राजेश खवले , मनपाचे अतिरिक्त आयुक्त दिपक पाटील आदींसह विविध विभागाचे  विभागप्रमुख उपस्थित होते.

            नवीन तक्रार कर्त्यांना १५ दिवसात आपल्या तक्रारीवर कार्यवाही होवून त्याबाबत कळविण्यात येईल असा दिलासा पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी  तक्रार कर्त्यांना दिला.  प्रारंभी पालकमंत्री यांनी मागील  जनता दरबारात प्राप्त झालेल्या तक्रारींचा  आढावा घेतला. या तक्रारींवर काय कारवाई करण्यात आली, याबाबतची माहिती अधिकाऱ्यांकडून त्यांनी जाणून घेतली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर  पंधरा दिवसांत कोणत्याही परिस्थितीत तक्रारींचे निराकरण करावे. तक्रारीवर काय कारवाई केली. याबाबतच्या अुनपालनाची प्रत आपल्याला व संबंधित तक्रारदाराला वेळेत देण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री यांनी यावेळी दिले. तसेच पालकमंत्री म्हणाले की, प्रशासनाकडून समस्या तातडीने सोडविल्या गेल्या पाहिजे अशी जनतेची अपेक्षा असते तक्रार प्राप्त झाल्यावर त्याबाबतची  प्राथमिक माहिती घेवूनच  अधिका-यांनी जनता दरबारात उपस्थित राहावे,  असेही ते म्हणाले.

            सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी विभागप्रमुखांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले की, या पुढेही नागरिकांच्या तक्रारी तत्काळ सोडविण्यासाठी दक्षता घ्यावी.  तक्रार घेवून आलेल्या नागरिकांची निराशा होता कामा नये. याकडे विभागप्रमुखांनी कटाक्षांने लक्ष देवून त्यांच्या समस्या सोडवाव्यात , अशा सुचना त्यांनी दिल्यात.  या बैठकीला अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, उपविभागीय अधिकारी संजय खडसे ,अभयसिंह मोहिते , जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे    यांचेसह सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

Web Title: The Guardian Minister Janata Darbar; A total of 9 6 complaints received

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.