ठळक मुद्देबाजारपेठेत तेजी येणार!रकी-ढेपवर लावलेला पाच टक्के जीएसटी सरसकट माफ

संजय खांडेकर। 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला :  सरकी-ढेपवर लावलेला पाच टक्के जीएसटी सरसकट माफ केल्याने देशभरात सरकी-ढेपचा कोट्यवधींचा पुरवठा करणार्‍या अकोल्यातील  उद्योजकांना दिलासा मिळाला आहे. सोबतच या निर्णयामुळे कास्तकार आणि पशुपालक सुखावला आहे. ९ सप्टेंबरच्या जीएसटी परिषदेच्या या निर्णयामुळे    सरकी-ढेप बाजारपेठेत तेजी येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. जुलैपासून लागू झालेल्या जीएसटी कायद्यात शेतमाल, पशुखाद्यास करमुक्त केले; मात्र सरकी-ढेपवरील करासंदर्भात शासनाने स्पष्ट भूमिका घेतली नव्हती. सरकी-ढेपचा वापर कारखानदार करीत असल्याचे बोलले जात असल्याने, सरकी-ढेपवर पाच टक्के जीएसटी लावला गेला होता. शासनाच्या या निर्णयामुळे उद्योजक आणि पशुपालकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटला. त्यामुळे विदर्भ आणि खंडवा परिसरातील ढेप उद्योग संकटात सापडला होता. याबाबत अनेक तक्रारी जीएसटी पोर्टलवर नोंदविल्या गेल्यात. अनेक निवेदने शासनापर्यंत पोहोचलेत. दरम्यान, हैदराबाद येथे झालेल्या जीएसटीच्या परिषदेत अनेक करप्रणालीत बदल केला गेला. या बदलात सरकी-ढेपला जीएसटीतून पूर्णपणे मुक्त करण्यात आले आहे. ९ सप्टेंबर रोजी झालेल्या या निर्णयाचे अकोल्यातील उद्योजकांनी स्वागत केले आहे.
कापसाचा पेरा विदर्भात मोठय़ा प्रमाणात असल्याने कापूस आणि त्यापासून निघणार्‍या वेस्टेजवर प्रक्रिया करणारे उद्योग जास्त आहेत. त्यातूनच अकोल्यात ढेपची मोठी बाजारपेठ उभारली आहे. अकोल्याच्या औद्योगिक वसाहतीत जवळपास १५ उद्योग सरकी-ढेपचे असून, देशातील कानाकोपर्‍यात येथील सरकी-ढेप प्रसिद्ध आहे. 
दुधाळ जनावरांच्या दुधाच्या प्रमाणात वृद्धी होत असल्याने पशुपालकांकडून सरकी-ढेपला कायम मागणी असते. कधीकाळी अकोल्यात सरकी-ढेपचे ४५ उद्योग होते; मात्र डब्बा ट्रेडिंगमुळे आणि शासनाच्या धोरणामुळे अकोल्यातील ३0 उद्योग डबघाईस आले. त्यातूनच ढेपचे भाव घसरले. जानेवारी २0१७ मध्ये ढेपचे भाव २३00 रुपये प्रतिक्विंटल होते. हे भाव सातत्याने घसरत आठ महिन्यांत अध्र्यावर आले आहेत. १४५0 प्रतिक्विंटल ढेपचे भाव आज बाजारपेठेत आहेत. 

बाजारपेठेत तेजी येणार!
एकीकडे ढेपचे भाव घसरले तर दुसरीकडे शासनाचे  जीएसटी धोरण आडवे येत होते; मात्र आता सरकी-ढेप उद्योग जीएसटीतून मुक्त झाल्याने बाजारपेठेत पुन्हा तेजी येण्याची शक्यता आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.