‘थॅलेसीमिया’ग्रस्तांसाठी शासनाने आर्थिक तरतूद करावी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:37 PM2019-05-13T12:37:09+5:302019-05-13T12:37:25+5:30

अकोला: केंद्र व राज्य शासनाने आपल्या बजेटमध्ये ‘थॅलेसीमिया’ग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी आर्थिक तरतूद करून पोलिओप्रमाणे थॅलेसीमियामुक्त भारतासाठी सकारात्मक पाऊल टाकावे, असे आवाहन थॅलेसीमिया सोसायटीचे अध्यक्ष हरीश आलिमचंदानी यांनी केले.

 Government should provide financial support for Thalassemia patients | ‘थॅलेसीमिया’ग्रस्तांसाठी शासनाने आर्थिक तरतूद करावी!

‘थॅलेसीमिया’ग्रस्तांसाठी शासनाने आर्थिक तरतूद करावी!

Next

अकोला: केंद्र व राज्य शासनाने आपल्या बजेटमध्ये ‘थॅलेसीमिया’ग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी आर्थिक तरतूद करून पोलिओप्रमाणे थॅलेसीमियामुक्त भारतासाठी सकारात्मक पाऊल टाकावे, असे आवाहन थॅलेसीमिया सोसायटीचे अध्यक्ष हरीश आलिमचंदानी यांनी केले.
थॅलेसीमिया दिनानिमित्त मेहरबानू महाविद्यालय येथे अकोला थॅलेसीमिया सोसायटीतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ. विनीत वरठे, डॉ. सचिन सदाफळे, डॉ. गोपाल माध्यान, कांता आलिमचंदानी, सिंधू सीनियर सिटिझन असोसिएशनचे अध्यक्ष ज्ञानचंद वाधवानी, झुलेलाल महोत्सव समितीचे अध्यक्ष कोडुमल चावला, मार्गदर्शक हरीश परवानी, हेडगेवार रक्तपेढीचे दीपक मायी, नीलेश जोशी, साईजीवन रक्तपेढीचे डॉ. गाढवे, डॉ. पाटणकर, डॉ. निखाडे, डॉ. अशोक ओळंबे, सोसायटीचे कमल आलिमचंदानी यांची उपस्थिती होती. यासंदर्भात देशभरात थॅलेसीमिया सोसायटीतर्फे पंतप्रधान, मुख्यमंत्री तथा संबंधित विभागाचे मंत्री यांना निवेदन देऊन यामध्ये थॅलेसीमियामुक्त भारतासाठी कठोर उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी कमल आलिमचंदानी यांनी दिली. याप्रसंगी थॅलेसीमिया आजारावर आधारित चित्रफीत दाखविण्यात आली. थॅलेसीमिया दिनानिमित्त थॅलेसीमिया सोसायटीच्या डे केअर केंद्रामधून जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये महिला-पुरुष, बच्चे कंपनी व थॅलेसीमियाग्रस्त रुग्णांनी फलकांद्वारे जनजागृती केली. ही रॅली धिंग्रा चौक, गांधी रोड, अमृतवाडी, स्वावलंबी विद्यालय, चिवचिव बाजार मार्गे मेहरबानू विज्ञान महाविद्यालय येथे पोहोचली. येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. प्रास्ताविक हरीश आलिमचंदानी यांनी केले. संचालन सोनाल ठक्कर यांनी, तर आभार राजश्री जोगी यांनी मानले. याप्रसंगी डॉ. आशुतोष पालडीवाल, रोहित जोगी, डॉ. गजानन भगत, सुशील रामटेके, यशपाल जाधव, संदीप राठोड, प्रवीण मराठे, थॅलेसिमीया सोसायटीचे सचिव अश्विन पोपट, सहसचिव संजय डेम्बडा, कोषाध्यक्ष दीपक भानुशाली, श्याम सारभुकन,अनिस खान,राहुल शर्मा, सचिन अंबाडकर, श्रीहरी ठाकरे, संदीप सुरळकर, प्रवीण शिरसाट, रमेश लुंडवाणी, सनी पाहुजा, प्रकाश धर्माळे, प्रदीप उत्तमचंदनी, भीमा मुलांनी, नूतन जैन, रवी आलिमचंदानी, हरीश शहा, अमित थडानी, सुरेश मनवानी, नरेश भाई, अतुल गवई, राहुल शिरसाट, विठ्ठल बहाळ, मधुर आलिमचंदानी, संदीप आलिमचंदानी, रूपाली ठाकरे, सुनीता आलिमचंदानी, रेखा शिरसाट, बहुसंख्य महिला-पुरुष, नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.

सामाजिक संघटनांचा सत्कार
थॅलेसीमिया क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पारस मित्र मंडळ, उगवा मित्र मंडळ, जिव्हाळा ग्रुप, पूर्वी रत्नपारखी, निरंकारी मंडळ, निशिकांत बडगे, आशिष कसले, राहुल शर्मा, मारवाडी युवा मंच, श्रीकांत मलिक, विक्रम तिवारी, झुलेलाल महोत्सव समिती, अनंतपुरम ग्रुप, गाडगेबाबा मित्र मंडळ, जलाराम मेडी.सर्च आदी सामाजिक संघटनांना स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

 

Web Title:  Government should provide financial support for Thalassemia patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.