सुवर्ण नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळणार चालना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 01:16 AM2017-10-23T01:16:07+5:302017-10-23T01:16:39+5:30

शिर्ला: पातूर तालुक्यातील १८ किमी लांबीच्या सुवर्ण नदीच्या  पाणलोट क्षेत्रातील २0 हजार हेक्टर शेतीक्षेत्राला लाभदायक  ठरणार्‍या सुवर्ण नदी पुनरुज्जीवन महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला  चालना देणार असल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय  यांनी २0ऑक्टोबर रोजी  सांगितले.

Golden river revival project will get started! | सुवर्ण नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळणार चालना!

सुवर्ण नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळणार चालना!

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकार्‍यांनी दिला संकेत

लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्ला: पातूर तालुक्यातील १८ किमी लांबीच्या सुवर्ण नदीच्या  पाणलोट क्षेत्रातील २0 हजार हेक्टर शेतीक्षेत्राला लाभदायक  ठरणार्‍या सुवर्ण नदी पुनरुज्जीवन महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला  चालना देणार असल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय  यांनी २0ऑक्टोबर रोजी  सांगितले.
गेल्या दोन वर्षांपासून चिचखेड बोडखा, पातूर जिराईत, बागायत  आणि पट्टेअमराई, शिर्ला, भंडारज बु., भंडारज खु, तांदळी खु.,  तांदळी बु., बेलुरा बु., बेलुरा खु., हिंगणा या गावांसाठी २0.७१  लाख रुपये खर्च र्मयादेचा सुवर्ण नदी पुनरुज्जीवन महत्त्वाकांक्षी  प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केला होता.  त्यासाठी पालकमंत्री रणजित पाटील, आमदार बळीराम  सिरस्कार, प्रकल्प अध्यक्ष सचिन कोकाटे तथा संतोषकुमार  गवई यांनी पाठपुरावा केला होता. सदर प्रकल्पातून उपरोक्त  गावांमध्ये कामांना सुरुवात झाली; मात्र निधीअभावी कामे  थांबली. काही गावे जलयुक्त शिवार योजनेतून पहिला टप्पा सं पल्याने बाहेर पडली. यावर्षी सुवर्ण नदी पुनरुज्जीवन प्रकल्प  पाणलोट क्षेत्रात केवळ ४00 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  दुष्काळाच्या प्रचंड झळा सोसाव्या लागणार आहेत. प्रकल्पातील  शिर्ला गावात ६0 टक्के कामे झाली आहेत. जिल्हाधिकारी आस् ितककुमार पाण्डेय यांची २0 ऑक्टोबर  भेट घेऊन सुवर्ण नदी  पुनरुज्जीवन महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून करावयाच्या  जलसंधारणाच्या कामांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी  सुवर्ण नदी प्रकल्प अध्यक्ष सचिन कोकाटे, संतोषकुमार गवई त था उद्योजक अशोक लोहिया हे उपस्थित होते. 

Web Title: Golden river revival project will get started!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :riverनदी