वडिलांची हत्या करून मृतदेह बॅगेत नेणारी मुलगी, जावई गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 02:09 AM2017-10-18T02:09:36+5:302017-10-18T02:10:27+5:30

अकोला : जन्मदात्या पित्याची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचे तुकडे करून ते एका बॅगेत घेऊन जाणार्‍या मुलीला व जावयाला अकोला रेल्वे पोलिसांनी सोमवारी रात्री पकडले होते. त्या दोघांनाही रेल्वे पोलिसांनी नागपूर येथील प्रताप नगर पोलिसांच्या हवाली केले. 

The girl who took the body of the father to death, | वडिलांची हत्या करून मृतदेह बॅगेत नेणारी मुलगी, जावई गजाआड

वडिलांची हत्या करून मृतदेह बॅगेत नेणारी मुलगी, जावई गजाआड

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूर पोलिसांच्या दिले ताब्यातअकोल्यात केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जन्मदात्या पित्याची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचे तुकडे करून ते एका बॅगेत घेऊन जाणार्‍या मुलीला व जावयाला अकोला रेल्वे पोलिसांनी सोमवारी रात्री पकडले होते. त्या दोघांनाही रेल्वे पोलिसांनी नागपूर येथील प्रताप नगर पोलिसांच्या हवाली केले. 
मानसिंग कुंवरसिंग शिव (५५) रा. प्रताप नगर, दुर्गामाता मंदिराजवळ नागपूर, असे मृतकाचे नाव आहे. त्यांचा मृतदेह त्यांची मुलगी किरण व तिचा पती विजय अशोक तिवारी रा. बुलडाणा हे एका मोठय़ा सुटकेसमधून रेल्वे स्थानकाच्या दिशेने ऑटोतून घेऊन जात होते; मात्र सुटकेसमधून दुर्गंंधी आल्याने ऑटोचालकाने पोलिसांना फोन केला. त्याचा संशय आल्याने किरण व विजय दोघेही पळून गेले. पोलिसांना सुटकेसमध्ये मानसिंग यांचा मृतदेह दिसून आला. मुलगी व जावई मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या बेतात असल्याचा संशय पोलिसांना आल्याने त्यांनी अकोला रेल्वे पोलीस ठाण्याचे ठाणेदार एस. डी. वानखडे यांना माहिती दिली. त्यावरून ठाणेदार यांनी विदर्भ एक्स्प्रेसमधून मुलगी व जावयाला पकडले. त्याची माहिती त्यांनी नागपूर पोलिसांना दिली. मंगळवारी सकाळी नागपूर पोलीस अकोल्यात आले आणि आरोपी मुलगी व जावई याला अटक करून निघून गेले.

Web Title: The girl who took the body of the father to death,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा